बीड
आदित्य डेंटल कॉलेजची यशाची परंपरा कायम; बीडीएस परीक्षेत विद्यार्थ्यांचा डंका

आदित्य डेंटल कॉलेजची यशाची परंपरा कायम; बीडीएस परीक्षेत विद्यार्थ्यांचा डंका
—
*तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के; नेहा निनायडे, अंजली पालवे आणि दिशा अजपुंजे कॉलेजमध्ये प्रथम*
प्रतिनिधी | बीड
शहरातील आदित्य डेंटल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परीक्षांचे आयोजन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यशस्वीपणे पार पडले. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांनी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीची परंपरा कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे तृतीय वर्ष बीडीएसचा निकाल १०० टक्के लागला. नेहा निनायडे, अंजली पालवे आणि दिशा अजपुंजे यांनी कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा यांनी विद्यार्थ्यांचे अभीनंदन केले.
सर्व वर्षांतील निकाल अत्यंत समाधानकारक राहिला आहे. द्वितीय वर्ष बीडीएसचा निकाल ९५.७८ टक्के लागला. तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला. अंतिम वर्षाचा निकाल ८९.९१ टक्के लागला आहे. यामध्ये द्वितीय वर्ष: नेहा निनायडे (प्रथम- ५८८ गुण), नेहा मिरकुटे (द्वितीय), अश्विनी महाजन (तृतीय), तृतीय वर्ष: अंजली पालवे (प्रथम- ४२४ गुण), जान्हवी माळी (द्वितीय), शरवरी लोखंडे (तृतीय), अंतिम वर्ष: दिशा अजपुंजे (प्रथम- ११०५ गुण), भक्ती सांखे (द्वितीय), कमल तनवाडे (तृतीय) गुण मिळाले आहेत.
—-
*आरोग्य क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नाव कमवावे*
विद्यार्थ्यांनी यापुढेही आपले कौशल्य सिद्ध करत आरोग्य क्षेत्रात नाव कमवावे. हे यश विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे.
-सुभाषचंद्रजी सारडा (संस्थापक अध्यक्ष, आदित्य एज्युकेशन ग्रुप)
—
शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि महाविद्यालयातील सकारात्मक शैक्षणिक वातावरणामुळेच हे यश साध्य झाले आहे. सर्व गुणवंतांचे अभिनंदन.
-डॉ. आदिती सारडा (संचालिका, आदित्य शिक्षण संस्था)
—-
*मार्गदर्शनामुळेच यश शक्य- नेहा निनायडे*
द्वितीय वर्षात ५८८ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावता आला. याचे सर्व श्रेय सुभाषचंद्रजी सारडा, डॉ. आदिती सारडा, प्राचार्य डॉ. एम. रॉबर्ट जस्टिन, उपप्राचार्य डॉ. हिमांशू श्रीवास्तव, डॉ. हरिकुमार यांच्या मार्गदर्शनाला जाते. सिनियर्सनीही मला खूप प्रेरणा दिली.
—-
*कॉलेजच्या सुविधांचा फायदा झाला- दिशा अजपुंजे*
अंतिम वर्षात १६०० पैकी ११०५ गुण मिळवून यश मिळवता आले. संपूर्ण वर्षभर प्राचार्य डॉ. एम. रॉबर्ट जस्टिन, डॉ. हिमांशू श्रीवास्तव आणि शिक्षकांनी दिलेला पाठिंबा मोलाचा ठरला. महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या उत्तम सुविधांमुळेच हे यश शक्य झाले.
—-
*प्राध्यापकांचे ऋण सदैव राहील – अंजली पालवे*
तृतीय वर्षात ६०० पैकी ४२४ गुण मिळवून प्रथम येण्याचे भाग्य मला लाभले. कॉलेज आणि सर्व प्राध्यापकांनी मला पावलोपावली मदत केली. विशेषतः प्राचार्य डॉ. एम. रॉबर्ट जस्टिन,डॉ. हिमांशू यांच्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांची सदैव ऋणी राहीन.



