📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

‘अतिवृष्टी’मुळे शेतकऱ्यांचे नुकसान, तातडीने पंचनामे करा

‘अतिवृष्टी’मुळे शेतकऱ्यांचे नुकसान, तातडीने पंचनामे करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांची मागणी
बीड: बीड जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून संततधार आणि काही भागात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. अनेक ठिकाणी नद्यांच्या पात्रातून पाणी बाहेर आले असून शेतातील पिके पाण्यात आहेत. शिवाय जमितीनी खरडून गेल्या असून या नुकसानीचे तातडीने पंचमाने करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, बीड जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून संततधार व काही ठिकाणी अतिवृष्टीने हजेरी लावली असून सर्वत्रच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागात पुरपरस्थिती निर्माण झाल्याने जमीन वाहून गेल्या आहेत. तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.याच बरोबर जनावरेही दगावली असून शेतकऱ्यांचे सर्वच बाजुने नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना द्याव्यात. शेतकऱ्यांनी देखील आपल्या नुकसानीचे फोटो व व्हिडिओ स्वत:कडे जतन करून ठेवावेत, तसेच नुकसानीबाबतची तक्रार फोटो, व्हीडिओसह तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करावी. पंचनामे करून घेण्यासाठी सरपंच आणि गावपातळीवर काम करणाऱ्या मंडळींनी पुढाकार घेवून पंचनामे पुर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, पंचनामे झाल्यास मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही म्हटले आहे. यावेळी बळीराम गवतेंसोबत राष्ट्रवादीचे महादेव उबाळे, जयराम गित्ते, संदीप उबाळे, सचिन घरत, अनिल चव्हाण, संतोष तांदळे, गुड्डू काळे यांची उपस्थिती होती.
–
Back to top button