मराठवाडा भूषण लोकनेते आ. सुरेश अण्णा धस यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

मराठवाडा भूषण लोकनेते आ. सुरेश अण्णा धस यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
व्हीबी-जी-रामजी नव्या रोजगार हमी योजनेत ग्रामपंचायतींच्या २० कामांवरील अट शिथिल
विधिमंडळात सातत्याने आवाज उठवल्यानंतर शासनाचा निर्णय;
ग्रामपंचायतींना विकासकामांना मिळणार गती
आष्टी (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील रोजगार, विकास आणि ग्रामपंचायतींच्या कामांना मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. व्हीबी-जी-रामजी (विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी मिशन – ग्रामीण) या नव्या रोजगार हमी योजनेत वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाच्या कामांवरील अटी शिथिल करण्यात आल्या असून ग्रामीण कुटुंबांना वर्षाकाठी शंभर दिवसांऐवजी एकशे पंचवीस दिवस अकुशल रोजगाराची कायदेशीर हमी देण्यात आली आहे. या निर्णयासाठी आमदार सुरेश आण्णा धस यांनी विधिमंडळात सातत्याने आवाज उठवत प्रभावी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने ग्रामीण भागात समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक विकासकामे विविध नियम व अटींमुळे रखडत असल्याची बाब आमदार सुरेश आण्णा धस यांनी विधिमंडळात ठामपणे मांडली होती. ग्रामपंचायतींना अधिक स्वातंत्र्य मिळावे, रोजगार हमीची कामे वेगाने सुरू व्हावीत आणि शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य ग्रामीण कुटुंबांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी त्यांनी सातत्याने केंद्र व राज्य शासन स्तरावर पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याची दखल घेत केंद्र शासनाने व्हीबी-ग्राम-जी योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण बदल करत वैयक्तिक व सार्वजनिक कामांवरील अटी शिथिल केल्या आहेत.तसेच ग्रामीण कुटुंबांना मिळणाऱ्या रोजगाराच्या दिवसांमध्ये वाढ करून शंभर दिवसांवरून एकशे पंचवीस दिवसांची कायदेशीर हमी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना विकासकामे राबविताना अधिक सुलभता मिळणार असून जलसंधारण, मृदसंधारण, वृक्षलागवड, ग्रामीण रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि रोजगारनिर्मितीची विविध कामे अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
या निर्णयामुळे राज्यातील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण विकासाला नवी गती मिळणार आहे. रोजगाराच्या वाढीव संधीमुळे हजारो ग्रामीण कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ मिळणार असून, आमदार सुरेश आण्णा धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे महत्त्वपूर्ण यश मानले जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.



