बीड

नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची ‘पेढे तुला’ करीत अक्षय भुमकर यांनी त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले

नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची ‘पेढे तुला’ करीत अक्षय भुमकर यांनी त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले
*मंगळवार पेठ भागात जंगी स्वागत ; १११ किलोंची पेढे तुला*
=======================
 *अंबाजोगाई (प्रतिनिधी)बालाजी देशमुख*
आपल्या नेत्यांविषयी किती प्रेम असावे, व ते कसे व्यक्त करावे. याचा प्रत्यय अंबाजोगाईकरांना नुकताच आला. शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची ‘पेढे तुला’ करीत कार्यकर्ते अक्षय भुमकर यांनी त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले. यावेळी मंगळवार पेठ भागात जंगी स्वागताचा सोहळा आयोजित करून भुमकर यांनी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची १११ किलोंची पेढे तुला करून आपला नवस पूर्ण केला.
नंदकिशोर मुंदडा हे मागील ४० वर्षांपासून केज विधानसभा मतदारसंघासह अंबाजोगाईच्या समाजकारण आणि राजकारणातील एक महत्त्वाचे नेते व प्रमुख नांव आहे. केज विधानसभा मतदारसंघ ज्यांना खडानखडा माहित असलेले व प्रत्येकाच्या सुखदुःखात, मदतीला धावून जाणारे, अहोरात्र जनसेवेसाठी कार्यरत असलेले, प्रचंड जनसंपर्क असलेले, किंगमेकर नेते अशी नंदकिशोर मुंदडा यांची सर्वदूर ओळख आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत श्री. मुंदडा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून अंबाजोगाईकरांनी त्यांना भरभरून मतदानरूपी आशीर्वाद देवून नगराध्यक्षपदी विराजमान केले. श्री.मुंदडा यांना केज विधानसभा मतदारसंघात काकाजी या नांवाने लहान, थोर सर्वजण संबोधतात. आपल्या घरातील ज्येष्ठ, आदरणीय व्यक्ती म्हणून ही त्यांच्या कार्याविषयी नेहमीच आदरभाव व्यक्त केला जातो. असे आपले काकाजी यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या राजकीय आयुष्यात अनेकांना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती केले. विविध पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आपला कार्यकर्ता, हितचिंतक राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठा करण्याचे काम काकाजी यांनी केले. अंबाजोगाई शहरातील याच निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव काकाजी हे प्रथमच स्वतः एका निवडणूकीसाठी उमेदवार म्हणून उभे होते. ते निवडून येवून अंबाजोगाई शहराचे नगराध्यक्ष व्हावेत म्हणून निष्ठावंत मुंदडा समर्थक अक्षय भुमकर या त्यांच्या कार्यकर्त्यांकडून श्री योगेश्वरी देवीकडे नवस करण्यात आला होता. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अखेर श्री योगेश्वरी देवी नवसाला पावली. म्हणून बोलल्या प्रमाणे अक्षय भुमकर यांनी आपल्या मित्र परिवारासह नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांचा जंगी सत्कार, पेढे तुला व नवनिर्वाचित नगरसेवक मुस्तकीम शेख, मैनाबाई काळे, सुचिता अतुलराव देशपांडे, गणेश देशमुख, शिल्पा संजय गंभीरे, महेश अंबाड, रचना परदेशी, बबिता महादेव आदमाने यांचा ह्रदय सत्कार समारंभ मंगळवार पेठ भागात आयोजित केला होता. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे भव्य पुष्पहार, पुष्पगुच्छ, फेटा बांधून व‌ पेढे वाटून, फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले. अक्षय भुमकर यांच्या पुढाकाराने मंगळवार पेठ भागातील नागरिकांनी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांची ‘पेढे तुला’ करीत त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले आहे. व भुमकर यांनी काकाजींच्या नगराध्यक्षपदासाठी केलेला नवस १११ किलोंची पेढे तुला करीत पूर्ण केला. यावेळी ज्येष्ठ नेते दिनेश परदेशी, बळीराम चोपणे, शहराध्यक्ष संजय गंभीरे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, हिंदूलाल काकडे, नूर पटेल, महादेव आदमाने, डॉ.अतुल देशपांडे, संतोष शिनगारे, संतोष काळे, प्रशांत आदनाक आणि वाजेद खतीब यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सत्कार समारंभासाठी अशोक वेदपाठक, ऍड.राजमोहन तापडिया, चंद्रकांत गुमटे, अरूण पिंपळे, गोविंद पिंपळे, शिवाजी पंचभाई, दिपक पिंपळे, गोविंद तापडिया, सुनील भराडिया, सर्फराज शेख, मुन्ना सोमाणी, संजय सूर्यवंशी, धनंजय हाळवे, अनंत पिंपळे, श्याम सोमाणी, अमोल कांबळे, महपती कांबळे, गौरव कामळे, नरसिंग नंदगवळी, श्रीनिवास पिंपळे, राजू पिंपळे, श्रीराम पिंपळे, मनोज पिंपळे, शाम पिंपळे, दिपक सुरवसे, अविनाश साठे, कुलदीप परदेशी, जयपाल ठाकूर, समीर लाटा, महेश तपके, प्रेमचंद पंचभाई, सुमीत पिंपळे, प्रदीप पंचभाई, सुजीत पंचभाई, आकाश नागवंशी, नागेश नवगिरे, सचिन नवगिरे, बालाजी नवगिरे, भवानीशंकर शर्मा, राहुल शेटे, नामदेव माने यांची उपस्थिती होती. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन बालाजी शेरेकर यांनी केले. तर प्रास्ताविक अक्षय भुमकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी सत्काराला उत्तर दिले. तर ज्येष्ठ नेते दिनेश परदेशी, शहराध्यक्ष संजय गंभीरे यांची अभिनंदनपर समायोचित भाषणे झाली. उपस्थितांचे आभार जयपाल ठाकुर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अक्षय भुमकर मित्र परिवार यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.
*अंबाजोगाईकरांच्या सेवेसाठी कटिबद्ध :*
मागील ४० वर्षांपासून अंबाजोगाईच्या जनतेने मुंदडा परिवाराला भरभरून आशीर्वाद दिला आहे. विविध पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याची आम्हाला जाणीव आहे. याच जाणिवेतून आगामी काळात ही आमदार सौ.नमिता व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातून अंबाजोगाईकरांच्या सेवेसाठी व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपले हे प्रेम आणि विश्वास असाच कायम असू द्या, अक्षय भुमकर यांच्यासारख्या तरूणांना भविष्यात समाजकारण आणि राजकारणात पाठबळ देण्याचे काम केले जाईल.
*~ नंदकिशोर मुंदडा*
(नगराध्यक्ष, नगरपरिषद, अंबाजोगाई.)
*नगराध्यक्ष म्हणून काकाजी न्याय देतील :*
आमच्या नेत्या आमदार सौ.नमिताताई व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातून केज विधानसभा मतदारसंघासह अंबाजोगाई शहरात कोट्यवधी रूपयांचा विकास निधी खर्च झाला आहे. यातून शहरातील रस्ते, नाल्या, सामाजिक सभागृह, स्मशानभूमी, वीज, जलवाहिनी यांसह असंख्य कामे पूर्ण झाली आहेत. काही होत आहेत. काकाजी नगराध्यक्ष व्हावेत अशी माझ्यासारख्या असंख्य समर्थकांची इच्छा होती. मी यासंदर्भात श्री योगेश्वरी देवीकडे नवस बोललो होतो. त्यासाठी काकाजी व इतर नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
*~ अक्षय भुमकर*
(मुंदडा समर्थक)
=
Back to top button