बीडब्रेकिंग

तालखेड ग्रामपंचायत समोर ग्रा. सदस्यच्या वतिने धरणे आंदोलन संपन्न

तालखेड (प्रतिनिधी ) : माजलगाव तालूक्यातील तालखेड मोठे बाजार पेठ चे गाव असुन 10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे.
विविध मागणी घेऊण सात ग्रामपंचायत सदस्य व गावकर्याच्या वतिने धरने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काही मागणी सोडवण्यात यश आले.ज्या नागरिकांचे घरकूलाचे हप्ते थकले असतील ते लवकरात लवकर काढून देऊ,सर्व तांडे व गावातदोन दिवसात धूर फवारनी करू, तांड्यावर आवश्यक ठिकानी मूरूम आठ दिवसात टाकण्यात येइल, कोणत्याच विद्यार्थ्या कडून कर आकारणी केली जानार नाही असे ग्रामविकास अधिकार्याने लेखी आश्वासन दिले. यापूढे PTR साठी कोणत्याच नागरिकांना अडविनार नाही. वित्त आयोगातील अपंगासाठी आलेल्या निधी दोनों दिवसात वाटप करण्यात येइल ,15 दिवसात RO बसवून पाण्याचा प्रश्न सोडविनार,सीमेंट रस्त्याचे व नालीचे कामे आराखड्यात टाकून ती लवकरात लवकर मार्गी काढू.असे लेखी आश्वासन देण्यात आले.

या आंदोलना साठी कॉ. अनिता विनायक चव्हाण मा. उपसरपंच तालखेड, मिरा रमेश मोरे ग्रा पं सदस्य, मिना दत्ता लबासे ग्रा पं सदस्य, बिबाबाई शेकू जाधव ग्रा पं सदस्य तालखेड, काॅ. विनायक चव्हाण, रमेश मोरे, दत्ता लबासे, काॅ. रोहीदास जाधव व्हाईस चेअरमन काॅ. माणिक पवार, काॅ माणिक जाधव, शेकू जाधव, काॅ. अनिल राठोड, काॅ. रवि जाधव, विशाल जाधव, राजू राठोड,भारत राठोड, समाधान क्षिरसागर, विजय ञिभवन, पप्पू डोंगर, इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button