संपादकीय

ST आंदोलन | मैदान सोडणाऱ्या सदाभाऊंना कर्मचाऱ्यांनी रोखलं

 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचारही मागच्या २ आठवड्यापासून आंदोलन करत आहेत त्यातच या आंदोलनात रयत क्रांती सांगतेचे अद्यक्ष सदाभाऊ खोत आणि आमदार गोपिचंद पडळकर हे सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खडा लावून या आंदोलनात सहभागी झाले होते मात्र एसटीच्या आंदोलकांसोबत ते संवाद साधत होते. परंतू यावेळी खोत यांना मोठ्या संख्येने भेटणाऱ्या आंदोलकांसमोर त्यांना अश्रुचा बांध फुटला.

सदाभाऊ खोत आणि भाजपनेते गोपिचंद पडळकर यांनी एसटी कामगाराच्या संपाला पाठिंबा दिला असून ते स्वतः आंदोलनात उपस्थित आहेत. काही जणांनी पसरवलेल्या खोट्या मॅसेजमुळे आपल्यावर विश्वास नसेल तर आपण आंदोलनातून बाहेर पडू असे खोत यांनी म्हटले. त्यावेळी खोत आझाद मैदान सोडण्याच्या तयारीत होते. कामगारांनी आपला पडळकर आणि खोत यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवत. त्यांना मैदानात रोखले.

आज आंदोलनाच्या 15 व्या दिवशी खोत आणि पडळकर यांनी संपकरी कामगारांशी संवाद साधताना, संपकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत असताना सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर झाले. यावेळी आपण आंदोलनावर ठाम राहायचं असं म्हणत रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांचा विश्वास वाढवला.

Back to top button