ब्रेकिंग

नीरज गुंडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबंधाबद्दल मलिक यांनी माहिती घ्यावी

 

मुंबई | आज सकाळी पत्रकार परिषेद घेऊन नवाब मलिक यांनी नीरज गुंडे यांचं नाव घेऊन मलिक यांनी केलेल्या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. ‘नीरज गुंडे यांच्याशी माझे संबंध आहेतच, ते नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण त्याबाबत बोलण्याआधी मलिक यांनी नीरज गुंडे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी,’ असं सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केलं.

‘नीरज गुंडे हा व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांचा दूत आहे. युती सरकारच्या काळात शिवसेना-भाजपमध्ये संबंध बिघडताच गुंडे हे उद्धव ठाकरे यांना भेटायचे. गुंडे यांना फडणवीसांच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात, निवासस्थानात थेट प्रवेश असायचा. सर्व अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये ते रोखठोक जायचे. पोलिसांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर त्याचं नियंत्रण होतं असा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यावर फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलं.

‘नीरज गुंडे यांच्या संदर्भात नवाब मलिक यांनी आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली पाहिजे. नीरज गुंडे यांच्याशी आमचा संबंध आहेच, १०० टक्के आहे. नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण मी जेवढ्या वेळा त्यांच्या घरी गेलो, त्यापेक्षा जास्त वेळा उद्धव ठाकरे त्यांच्या घरी गेलेत. मी जेवढ्या वेळा मातोश्रीवर गेलोय, त्यापेक्षा जास्त वेळा गुंडे ‘मातोश्री’वर गेलेत.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, माझ्या आधीपासून उद्धव ठाकरे व नीरज गुंडे यांचे संबंध आहेत. नवाब मलिक यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवं होतं असं फडणवीस म्हणाले. ‘मलिक यांच्याकडं नीरज गुंडे यांच्या विरोधात काही पुरावे असतेल तर त्यांनी द्यावे, काहीच अडचण नाही एखाद्यामध्ये वाझे पाहण्याची आम्हाला गरज नाही, ती सवय मलिक यांची आहे,’ असा टोलाही फडणवीस यांनी हाणला.

Back to top button