महाराष्ट्र

“नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”

 

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषेद घेऊन समीर वानखेडे यांच्यानंतर आपला मोर्चा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वळवला होता. त्यातच आज पत्रकार परिषेद घेऊन अनेक गंभीर आरोप फडणवीस यांच्यावर लगावले होते आता या टीकेला भाजपने सुद्धा सडेतोड उत्तर दिले आहे तुतः आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांच्यावर टीका केली आहे.

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसत असल्याचा खोचक टोला प्रविण दरेकरांनी लगावला आहे. रोज उठलं की कुठलातरी फोटो शोधायचा आणि त्याआधारे ट्विट करून सनसनाटी निर्माण करायची अशी मलिकांची सध्याची कामगिरी आहे, अशी खरमरीत टीका दरेकरांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करून मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

मंत्री म्हणून शपथ घेताना गुप्ततेच्या बाबतीत संविधानाने ज्या चौकट आणि अटी घालून दिल्या आहेत त्याचा भंगही मलिकांकडून होत असल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही दरेकरांनी केली आहे.

 

Back to top button