राजकीय

काचेच्या घरात राहणाऱ्यांना इतरांच्या घरावर दगड मारू नये

 

मुंबईत सध्या ड्रग्स प्रकरणी करण्यात आलेली कारवाई चांगलीच गाजत असून या प्रक्ररणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच रोज पत्रकार परिषेद घेऊन या प्रकरणी नवीन नवीन खुलासे करताना दिसून येत आहे. त्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिच्या अनुषंगाने काही गंभीर आरोप केले आहेत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

हमाम में सब नंगे हैं. कारण काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत. आमच्या पण हातात दगडं आहेत, असा चिमटा संजय राऊत यांनी भाजपला घेतला आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. एकमेंकावर आरोप करणं सुरू आहे. एकमेकांना खोट्या आरोपात फसवणं सुरू आहे. केंद्रीय चौकशी समितीचा गैरवापर करणं सुरू आहे. यापूर्वी असा कधी घडलं नाही.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मात्र मागच्या दोन वर्षात असे प्रकार वाढले आहेत. हे महाराष्ट्रातील राजकारण नाही. आता यात शरद पवारांना यात ओढलं जात आहे.‌ भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजे. आपल्या राजकारणासाठी पवारांसारखा मोठ्या नेत्यांवर टीका करत आहे, असा संजय राऊत म्हणाले आहेत, राजकारण म्हणल्यावर हमाम में सब नंगे होते है‌. मलिक यांनी काही पुरावे सादर केले आहेत.‌ मी विरोधकांना सांगू इच्छितो की, आम्ही तुमच्या एवढे खाली येणार नाही.‌ आम्ही कमरेखालचा वार केला नाही. आम्ही पवारांनी संस्कार असलेलं राजकारण केलं आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे

Back to top button