महाराष्ट्र

अन्यथा सहकार मंत्र्याची शिमगा दिवाळी साजरी करू

अन्यथा सहकार मंत्र्याची शिमगा दिवाळी साजरी करू

कराड | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. त्यातच आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहकार मंत्री त्यांना लक्ष करत टीका केली आहे.

पैसै कुणाला नको आहेत हे सहकार मंत्र्यांनी जाहीर करावे. उसाला एक रक्कमी FRP देण्यास विरोध करणाऱ्या सहकार मंत्र्यांनी त्यांचा आणि त्यांचा पीएचा ही पगार तीन टप्यात घ्यावा. जर एक रक्कमी FRP देण्यास टाळाटाळ करून जर शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणार असतील तर आम्ही सहकार मंत्र्यांच्या दारात जाऊन शिमगा दिवाळी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.

कराड येथे रयत क्रांती संघटनेने आज दि. 1 नोव्हेंबर रोजी ट्रक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, कृष्णत क्षीरसागर यांच्यासह शेतकरी आपले ट्रक्टर घेवून मोर्चात सहभागी झाले होते. कृष्णा कॅनाल ते कराड तहसील कार्यालयापर्यंत ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात एकरकमी एफआरपीची मागणी करण्यात आली.

Back to top button