संपादकीय

शेतकरी आंदोलन वेगळं आणि इतर आंदोलन वेगळं, – राजू शेट्टी

 

नाशिक | एसटी महामंडळाच्या संपात सहभागी झालेल्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अक्षरशः आझाद मैदानातून पायउतार होऊन परतावे लागले होते. याच मुद्दयावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी टोला लगावला आहे. ऊसाला प्रतिटन 3700 रुपये भावल द्या. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सध्या नाशिक दौऱ्यावर असून, पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावर त्यांनी ही टीका केली आहे

गृहपाठ न केल्यानं तोंडावर पडावं लागतं. शेतकरी आंदोलन वेगळं आणि इतर आंदोलन वेगळं, अशी जोरदार टीका राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर केली आहे. चळवळ म्हणजे एकप्रकारचा वाघ आहे. या वाघावर स्वार होणं हे सोपं नाही. एकदा स्वार होऊन परत पायउतार होणं हे कठीण आहे. पायउतार झालात तर तो वाघच तुम्हाला खाऊन टाकतो, असंही शेट्टी म्हणाले आहेत.

तसेच भ्रष्टाचाराचा आरोप झालेले कारखाने चौकशी करून सुरू करण्यात यावे. अशी मागणीही त्यांनी केली आहे. साखरेचा क्विंटलमागे 400 ते 500 रूपयांचा भाव वाढला आहे. तसेच इथेनॉलचे देखील भाव वाढले आहेत. असाही ते म्हणाले. तसेच याचदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलनातून आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. परिणामी या दोन्ही नेत्यांवर सर्व स्तरातून जोरदार टीका केली जात आहे.

Back to top button