संपादकीय

शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना फोन करा आणि त्यांचे दु:ख ऐकून घेत आर्थिक मदत द्या – राहूल गांधी

 

नवी दिल्ली | कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे, जर खरंच माफी मागायची असेल तर शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना फोन करा आणि त्यांचे दु:ख ऐकून घेत आर्थिक मदत द्या, अशी मागणी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी कायदे माघे घेतले होते.

काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी नाही असे उत्तर देणाऱ्या मोदी सरकारला राहुल गांधी यांनी धारेवर धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केवळ आपल्या उद्योगपती मित्रांचे संपर्क क्रमांक आहेत. पृषी कायद्यांबाबत ते माफी मागतात, मग त्यांनी लखीमपूर प्रकरणातील मंत्र्यांना कधी बरखास्त करणार? आंदोलकांवरही खोटी प्रकरणे मागे कधी? हमीभावावर कायदा कधी? या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय माफी अपुरी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पुढे बोलतां राहुल गांधी म्हणाले की, आम्ही तुम्हाला यादी देतो, तुम्ही त्यांच्या कुटुंबीयांना मदत करा असे सांगत राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनातील 700 पैकी 500 शहीद शेतकऱ्यांची यादीच पत्रकार परिषदेत सादर केली. पंजाब सरकारकडे 403 लोकांची यादी आहे. ज्यांना त्यांनी प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली आणि 152 जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. इतर राज्यांमधील 100 नावांची पण यादी पंजाब सरकारकडे आहे.

Back to top button