संपादकीय

महागाई, बेरोजगारी आणि कृषी संकटाचे एकच मूळ – राहुल गांधी

 

 

नवी दिल्ली | देशात सत्तेत असलेल्या मोदी सरकारला घेरण्यासाठी सर्वच विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई, बेरोजगारी, कृषी संकट, चीनचा ताबा- या सर्वांचे मूळ एकच आहे. अहंकार, मित्रप्रेम आणि मोदी सरकारचे अपयश, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधींनी करुन केंद्रावर टीका केली आहे.

दुसरीकडे राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि कुटुंबीयांना नोकऱ्या मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी लोकसभेत सरकारकडे केली आहे. यासोबतच त्यांनी लोकसभेत कृषी कायद्याविरोधी आंदोलन करणाऱ्या तसेच या आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची यादी सादर केली.

आंदोलनादरम्यान पंजाबमधील 400 आणि हरियाणातील 70 शेतकऱ्यांची यादी सुपूर्द करताना ते म्हणाले की, पीडित शेतकरी कुटुंबांना भरपाई आणि रोजगार मिळावा, अशी माझी इच्छा आहे. तुमच्याकडे शेतकऱ्यांच्या मृत्यूची कोणतीही आकडेवारी नाही, आम्ही तुम्हाला नाव आणि पत्ता देत आहोत. त्यांची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, अशी मागणी राहुल यांनी केली. पण, सत्ताधारी पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रसने सभात्याग केला.

Back to top button