मुंबई

अभिनेत्री दिव्या भारतीच्या वडिलांचे निधन,

 

मुंबई | दिवगंत अभिनेत्री दिव्या भारती हिचे वडिल ओम प्रकाश भारती यांचे निधन झाले आहे. ओम प्रकाश भारती यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ३० ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले मात्र सोमवारी बातमी समाजमाध्यमांवर सांगण्यात आली. काही दिवसांपासून त्यांची तब्येत अतिशय खालावली होती तसेच वयोमानानुसार त्यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे

दिव्या भारतीचा नवरा साजिद नाडियावाला याने तिच्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, दिव्या भारती यांच्या निधनानंतर तिच्या आई वडिलांची संपूर्ण जबाबदारी तिचा नवरा साजिद नाडियावाला याने घेतली. वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत साजिद नाडियावाला त्यांच्या सोबत होता. दिव्या भारतीच्या वडिलांच्या निधनांनतर तिच्या आईची संपूर्ण काळजी देखील साजिद नाडियावालाच घेत आहे.

साजिद नाडियावाला दिव्याच्या आई वडिलांना स्व:च्या आईवडिलांप्रमाणे जपतो. त्यांना तो मॉम डॅड नावाने हाक मारतो. दिव्या आणि तिचे वडील आता या जगात नाही मात्र साजिद तिच्या आईची काळजी घेतोय. दिव्या भारतीचा गॅलरीतून पडून मृत्यू झाला होता मात्र तिचा मृत्यू हा खून असल्याचे म्हटले जाते होते. साजिद नाडियावाला याच्यावर देखील खूनाचा आरोप करण्यात आला होता मात्र पोलिसांनी दिव्या भारतीचा मृत्यू अपघाती मृत्यू म्हणून घोषित केला.

Back to top button