संपादकीय

ऑन-लाइन माध्यमातून लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपनीला मनसेटेलिकॉम संघटनेचा दणका

 

मुंबई | आज दुपारी मनसे टेलिकॉम संघटनेचे अध्यक्ष सतिश नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र विद्यार्थीं सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्र यांच्या नेतृत्वाखाली ओ-लाइन-ओ कंपनीच्या घाटकोपर येथील कार्यालयावर मनसेने धडक मोर्चा दिला होता. यावेळी संख्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संसर्गाचे नियम पाळून आंदोलन केले होते. एकीकडे सामान्य नागरिक कोरोनाची झळ सोसत असताना तसेच छोटे व्यवसायिक अडचणीत असताना या कंपनीच्या मार्फत वेगवेगळे अमिश दाखवून सामान्य नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे चित्र टेलिकॉम संघटनेच्या निदर्शनास संघटनेच्या सभासदांनी आणून दिले होते.

यावेळी अखिल चित्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या पधाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच घाटकोपर पोलीस स्थानकात कंपनीच्या विरोधात तक्रार दिली होती. आज एकीकडे सामान्य माणूस कोरोनाच्या संसर्गाने आणि बेरोजगारीमुळे हतबल झालेला असताना ओ-लाइन-ओ कंपनी लोकांना अमिश दाखवणे, झटपट लॉटरी आशा जुगारी वृत्तीसाठी नागरिकांना प्रवृत्त करत आहे अशा कंपनीला आळा घालण्यासाठी मनसे टेलिकॉम संघटना मैदानात उतरली आहे. तसेच कंपनीला धडा शिकवण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते.

अशातच मनसे टेलिकॉम संघटनेचे अध्यक्ष सतिश नारकर यांच्या नेतृत्वाखाली दि २१ ऑक्टोबर रोजी घाटकोपर(प) येथे संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे तरी या कंपनीच्या अवैध मनमानी कारभाराला आळा बसण्यासाठी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आव्हान अध्यक्ष सतीश नारकर यांनी केले आहे.

Back to top button