रायगड

पाली पोलीस स्टेशन बनले स्मार्ट, पोलीस ठाण्याचा कायापालट; कामकाजाला तंत्रज्ञानाची जोड, ए ++ मानाचा दर्जा प्राप्त

पाली पोलीस स्टेशन बनले स्मार्ट, पोलीस ठाण्याचा कायापालट; कामकाजाला तंत्रज्ञानाची जोड, ए ++ मानाचा दर्जा प्राप्त

रायगड जिल्हा उत्तर उपसंपादक/मंगेश यादव.

रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन्स स्मार्ट होण्यासाठी नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये पोलिस स्टेशनमधील कामकाज, तंत्रज्ञानाची जोड आदिचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पाली पोलिस ठाण्याला ए ++ मानाचा दर्जा मिळाला असून जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते व अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस निरिक्षक सरिता चव्हाण मॅडम यांना सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात स्मार्ट पोलिस ठाणे संकल्पना राबविण्यात आली होती. तालुक्याचे ठिकाण असलेल्या पाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन महामार्ग गेले आहेत. 109 गावांचा आदिवासी बहु गोल तालुका आहे. या तालुक्यात आदिवासी वर्ग वस्ती कड्या कपारात वसलेली आहे .अशात पाली पोलिस ठाणे अंतर्गत आणि बाह्यरंग रुपात मोठे बदल करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे कामाकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता आली आहे.मागील दोन वर्षा पासून सन्मानपत्र घोषित पाली पोलीस स्टेशन आहे. तर पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली

पाली पोलिस ठाण्याचे कामकाज आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याचे काम होत असताना पोलिस स्टेशनमधील कामकाज, तंत्रज्ञानाची जोड आदिचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पाली पोलिस ठाण्याला ए ++ मानाचा दर्जा मिळाला असून जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते व अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस निरिक्षक सरिता चव्हाण मॅडम यांना सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात स्मार्ट पोलिस ठाणे संकल्पना यामध्ये फक्त पोलिस ठाणे सजावट नसून अभिलेख वर्गीकरण सर्व शाखाचा डाटा मेटेंन, अद्यावतकरण, नाविण्यपूर्ण उपक्रम, संगणकीरण, आँनलाइन तक्रारीवर कारवाई या सर्वांचा सारावंश करून अभिनव संकल्पनेतून पाली पोलिस ठाण्याचे सर्वेक्षण झाले त्यानुसार A++ दर्जा मिळाला आहे. मागील दोन वर्षापूर्वी सन्मानपत्र प्राप्त यंदाही मिळाले आहे.पाली पोलिस ठाण्यातील तात्कालीन अधिकारी तसेच आताचे पोलिस अधिकारी, प्रत्येक टेबलवरील पोलिस स्टाफ, मुद्देमाल कारकुन सर्व पोलिसांच्या मदतीने पाली पोलिस ठाण्याचा गौरव झाल्याची प्रतिक्रिया पाली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सरिता चव्हाण मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Back to top button