बीड
फाल्गुन एकादशीच्यानिमित्ताने नारायणगड भक्तीचा जनसागर लोटला

फाल्गुन एकादशीच्यानिमित्ताने नारायणगड भक्तीचा जनसागर लोटला
नारायणगड शिवजयंती समितीच्या वतीने शिवजयंती साजरी
हजारो भक्तांनी घेतले दर्शन
कोळगांव, दि.२७ (बाळासाहेब घाडगे ) :- महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर दि.२७ फेब्रुवारी रोजी फाल्गुन वद्य शुद्ध पक्ष आमलकी एकादशी एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दिवसभर गडावर दर्शनासाठी भक्तांचा जनसागर लोटला होता. यावेळी देवस्थानच्या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले. तर भाविक भक्तांच्या सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी नारायणगड संस्थानाचे मठाधिपती हभप शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था स्वयंसेवकांनी केली गेली. यावेळी नारायणगड शिवजयंती समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ चे वंशज शिवाजीराजे जाधव, मठाधिपती महंत गुरुवर्य शिवाजी महाराज उत्तराधिकारी हभप महंत संभाजी महाराज शिवव्याख्याते यशवंत गोसावी, संपादक गंगाधर काळकुटे पाटील, गडाचे विश्वस्त मंडळाचे सदस्य दिलीप गोरे, सी ए जाधव राजेंद्र मस्के, कुंडलिक बापु खांडे, परमेश्वर तळेकर, ज्ञानदेव काशिद, यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली.
■ नारायणगड हे राज्यात धाकटी पंढरी म्हणून पुर्ण राज्यात झाले आहे. दरम्यान नारायणगडावर दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीनिमित्त जिल्ह्यामधून गांवागावातून भाविक भक्त, वारकऱ्यांच्या शेकडो दिंड्या, हाती टाळ मृदंगाच्या गजराने व विठ्ठल नामाच्या जयघोषाने लाखो भाविक दर्शन घेतात. दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या आमलकी एकादशी निमित्ताने मठाधिपती हभप शिवाजी महाराज यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी ची महापुजा करण्यात आली. यावेळी परिसरातील आणि बीड जिल्ह्यातील भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभर शेकडो वाहनातून गडावर हजारों भाविकभक्त दर्शनासाठी दाखल होत होते. या भाविक भक्तांच्या गर्दीने नारायणगडावर भव्य यात्रेचे स्वरूप आले होते.
————————— चौकट
नगद नारायण महाराज यांच्या २१३ व्या पुण्यतिथीच्या सप्ताहाची सांगता होणार…
दर महिन्याच्या एकादशी निमित्ताने नारायण गडावर दर्शनासाठी नेहमीच भावी भक्तांची वर्दळ असते. फाल्गुन महिन्याच्या एकादशीच्या निमित्ताने हजारो वारकरी, टाळकरी, युवक महिला मंडळ नागरिक यांच्या दर्शन रांगेने आणि नगद नारायण महाराज, विठ्ठल नामाच्या आणि माऊलींच्या जयघोषात नारायण गड परिसर फुलवून जातो. तसेच फाल्गुन शुद्ध द्वादशी नारायणगड संस्थानाचे पहिले मठाधिपती वैकुंठवासी नगद नारायण महाराज यांच्या २१३ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दि.२८ फेब्रुवारी रोजी मठाधिपती महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तन महाप्रसादाच्या वाटपाचे होणार आहे त्यांची जय्यत तयारी होत आहे.



