बीड

स्नेहसावली परिवारास माणुसकी टीमकडून दिवाळीची उबदार भेट 

स्नेहसावली परिवारास माणुसकी टीमकडून दिवाळीची उबदार भेट 

दिवाळीचा किराणा देऊन केली दिवाळी गोड

बीड ( प्रतिनिधी ) :बीड जवळील रामनगर येथे कार्यरत असलेल्या स्नेहसावली परिवारात वंचित मुले, मुली आणि वृद्धांची निःस्वार्थ सेवा निलेश व वैष्णवी मोहिते हे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून करीत आहेत. सध्या या ठिकाणी सुमारे ३० लहान मुले-मुली आणि १२ वृद्ध राहतात. या सर्वांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद खुलवण्यासाठी माणुसकी टीम बीड ने एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवला. दिवाळी फराळासाठी लागणारे सुमारे ₹४१०० मूल्याचे किराणा साहित्य माणुसकी टीमकडून स्नेहसावली परिवारास भेट म्हणून देण्यात आले. या उपक्रमामुळे या वंचित मुला-मुलींना आणि वृद्धांना दिवाळीचा आनंद लाभला. माणुसकी टीम गेल्या दहा वर्षांपासून समाजातील वंचित घटकांसाठी निःस्वार्थपणे कार्य करत आहे. या संस्थेचे नेतृत्व कीर्तनकार श्रीकृष्ण महाराज उबाळे करत असून त्यांच्या पुढाकाराने दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने मदत केली जाते. या कार्यात त्यांना मित्रपरिवाराने आर्थिक मदत केली. या भेटीच्या वेळी जालिंदर नाईकवाडे, सुधाकर राठोड, अमोल तुपे आणि संतोष डोंगरे हे माणुसकी टीमचे कार्यकर्ते उपस्थित होते. माणुसकी टीमचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने वंचितांपर्यंत आनंद पोहोचवणं, हीच खरी माणुसकी आणि खरी दिवाळीची ओवाळणी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या संस्थेबरोबर पूरग्रस्त तसेच आदिवासी बांधवांनाही दिवाळी भेट दिली जाणार आहे.

Back to top button