संपादकीय

‘सदाभाऊ पाया पडले, तर नांगरे पाटलांना भिऊन पडळकर माझ्याकडे आले’

 

राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं म्हणत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. त्यानंतर, आमदार खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनातून तात्पुरती माघार घेतल्याचं जाहीर करत, आझाद मैदान सोडलं. त्यानंतर, आंदोलक कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांचं नेतृत्व करताना पडळकर व खोत यांच्यावर टीका केली आहे.

आपण संघटनेतील कामगारांचे पैसे गोळा केले, त्यातून ३ कोटी रुपये जमा केल्याचा आरोप तुमच्यावर होत असल्यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना सदावर्ते यांनी आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली होती.

‘मी एक रुपयाही कोणाकडून घेतला नाही, मी संघटना म्हणून नाही. सदाभाऊ तुम्ही पाया पडलेले व्हिडिओ माझ्याकडे आहेत, ती रेकॉर्डींग जर मी सांगितली. तुम्ही म्हणालात, दोन लेकरांची शपथ घेतो. पण, सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर तुम्ही माझ्या घरी दोनदा आला होतात. विश्वास नांगरे पाटलांची भीती वाटत होती म्हणून आलात. हे पराभूत मानसिकतेतून काहीही बोललं जात आहे,’ असे सदावर्ते म्हणाले.

माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत, माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डींग आहे, सदाभाऊ तुम्ही वयोवृद्ध आहेत, म्हणून बोलत नाही. पण, १० किमीवरील ओबीसींसाठीची शाळा, सांगू काय लोकांना, शाळेवर हे प्रकरण सदाभाऊंना घेऊन गेलं हे मी डंके की चोटवर सांगतो, असे म्हणत सदावर्तेंनी पडळकर आणि खोत यांच्यावर टीका केली आहे. आता या टीकेला खोत आणि पडळकर काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

Back to top button