बीड

खर्डा येथे A1 मोबाइल शॉपवर “संविधान” भेट देऊन नवनिर्वाचित नगरसेवक संतोष गव्हाळे व सागर भाऊ टकले यांचा दिमाखी सत्कार!” युवकांची मोठी गर्दी

खर्डा येथे A1 मोबाइल शॉपवर “संविधान” भेट देऊन नवनिर्वाचित नगरसेवक संतोष गव्हाळे व सागर भाऊ टकले यांचा दिमाखी सत्कार!” युवकांची मोठी गर्दी

जामखेड प्रतिनिधी/31 डिसेंबर2025
काल दि. ३० डिसेंबर रोजी खर्डा येथील आशुतोष गायकवाड यांच्या A1 मोबाईल शॉपवर जामखेड नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगसेवक संतोष भाऊ गव्हाळे व सागर भाऊ टकले यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हा सत्कार “भारतीय संविधानाचे प्रास्ताविक” भेट देऊन पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड, आशुतोष गायकवाड व भाजपाचे युवक शहरप्रमुख सोनाजी सुरवसे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला.

संविधान भेट देऊन विशेष सन्मान;
नवनिर्वाचित नगसेवकांना भारतीय संविधानची प्रत भेट देऊन पुष्पहार व पुष्पगुच्छाने सत्कार करण्यात आला. हे भेटवस्तू लोकशाही मूल्यांचा आदर दर्शवणारी असल्याने विशेष महत्त्वाची ठरली. खर्ड्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगरसेवक संतोष गव्हाळे यांनी श्वेता गायकवाड यांचे आभार मानले. भाजपाचे युवा मोर्चा शहरप्रमुख सोनाजी सुरवसे, आकाश भाऊ पवार, कर्वेज वाणी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार दत्तराज पवार यांनी केले, तर श्वेता गायकवाड यांनी आभार मानले.

यावेळी पोलीस वारंट संपादिका श्वेता गायकवाड, नवनिर्वाचित नगसेवक अध्यक्ष संतोष गव्हाळे, सागर भाऊ टकले, पत्रकार दत्तराज पवार, आशुतोष गायकवाड, धनसिंग साळुंखे, भाजपा युवा शहरप्रमुख सोनाजी सुरवसे, गणेश सुळ, नाना आढाव, धनंजय सुरवसे, सुमित चावणे, बालू समुद्रे, आकाश (भाऊ) पवार, पृथ्वीराज पवार, अमित मदने, आनंद ठोकळे, बबलू कणसे, विजय लोंढे, आर्यन जावळे, यश पगारे, गोकुळ गोलेकर, राजेंद्र चव्हाण, कर्वेज वाणी, अक्षय थोरात, अंकुश क्षीरसागर, राजू बागवान, स्वप्नील शिंदे उपस्थित होते. युवकवर्गाच्या खेळीमेळीच्या वातावरणात सत्कार यशस्वी झाला.

Back to top button