तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा मोठ्या उत्साहात प्रारंभ

▪️ पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी :
अंजनगाव सुर्जी: शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती व पंचायत समिती अंजनगाव सुर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्रीमती राधाबाई सारडा, कला विज्ञान महाविद्यालय येथे तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात पार पडत आहे. दि. ३० व ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत होत असलेल्या या महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांसह सांस्कृतिक कलागुणांना प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे.
मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महोत्सवाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बळवंत वानखडे तर उद्घाटक म्हणून आमदार गजानन लवटे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून संजिता मोहपात्रा, कल्पना जायभाय (गटविकास अधिकारी, अंजनगाव पंचायत समिती) व पत्रकार बांधवाची प्रमुख उपस्थिती लाभली.
तालुका क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मलखांब, सामाजिक प्रबोधनात्मक नृत्य-नाट्य तसेच विविध विषयांवरील सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या IAS संजिता मोहपात्रा यांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रस्तुतीने भावनिक वातावरण निर्माण झाले. हे सादरीकरण पाहताना मुख्य कार्यकारी अधिकारी IAS संजिता मोहपात्रा यांना अश्रू अनावर झाले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यकमाच्या माध्यमातून शिक्षण, स्त्रि – भ्रूणहत्या, पर्यावरण, या व इतर विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सादरीकर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, कबड्डी, खो-खो आदी मैदानी खेळांचा समावेश असून सांस्कृतिक कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची उंची अधोरेखित झाली. या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, कबड्डी, खो-खो आदी मैदानी खेळांचा समावेश असून सांस्कृतिक कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले.
या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षण विस्तार अधिकारी व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन मोहम्मद न नाजीम सर यांनी केले, आभार प्रदर्शन प्रमोद दखणे सर यांनी केले. तर प्रास्ताविक सुधीर खोडे यांनी मांडले. याप्रसंगी विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर, शिला आठवले, दिलीप खंडारे, गरसमन्वयक व केंद्रप्रमुख प्रमोद दखणे, गजानन बारोळे, विकास भडांगे, संजय चिखले, रविंद्र कान्हेरकर, राहुल रोकडे, गुलाब शहा, अनिल मोहोड तसेच तालुका शिक्षक संघटना पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक-शिक्षकवृंद व पंचायत समिती शिक्षण विभाग कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, बुधवार दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता बक्षीस वितरण व समारोपीय समारंभ होणार असून, या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे.



