महाराष्ट्र

श्रीमती कृष्णाबाई सारडा इंग्लिश स्कूलमध्ये वादविवाद स्पर्धा उत्साहात संपन्न

▪️ पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी;

अंजनगाव सुर्जी : श्रीमती कृष्णाबाई सारडा इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी आयोजित आंतरशालेय वादविवाद स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता आणि संवादकौशल्याचे भव्य दर्शन घडले. या स्पर्धेत विषय होता, “कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्यांसाठी धोका आहे का?” ज्यावर विविध तालुक्यातील 12 शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले विचार मांडले. सर्वप्रथम विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन डॉ. माधुरी सारडा यांच्या हस्ते पार पडले, ज्याने कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात दिली.

या वादविवाद स्पर्धेत सीताबाई संगई मुलांच्या शाळेतील मिहिर राजेंद्र टाक याने पहिला क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक ज्ञानपीठ इंग्लिश स्कूलची झिकरा अयमन युनुस शाह, तर तृतीय क्रमांक सीताबाई संगई कन्या स्कूलची वसुंधरा मोहन पाटील हिने मिळविला. तसेच प्रोत्साहनपर पारितोषिकासाठी श्रीमती कृष्णाबाई सारडा इंग्लिश स्कूलची कु दर्पण नामदेवराव गवई आणि ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल (अकोट) ची अनुश्री अनिल बुंदेले यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. नमिता मालानी, डॉ. अनिकेत भुयार आणि आशिष हिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पंचमीया आणि किरण पारवे यांनी केले, तर आभारप्रदर्शनाची जबाबदारी सौ. संगीता ढोके यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशासाठी श्री. आशिष शिंदिजामेकर आणि कल्पेश नवले यांनी विशेष प्रयत्न केले.

सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे कृष्णाबाई सारडा स्कूलचे अध्यक्ष डॉ. अमर सारडा, डॉ. माधुरी सारडा, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. वरुण वर्मा, प्रायमरी मुख्याध्यापिका सौ. कुंदा नायडकर, पर्यवेक्षिका सौ. माया चक्रनारायण तसेच संपूर्ण शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले.

Back to top button