बीड

सामाजिक क्रांती करणारा गणेशोत्सव – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

सामाजिक क्रांती करणारा गणेशोत्सव – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड दि.04(प्रतिनिधी)ः- कोरडे गणपती हा नवसाला पावणारा असून नवगण राजुरी, नामलगाव आणि कोरडे गणपती हे भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. सामाजिक क्रांती करणारा गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त गुरूवार दि.3 रोजी शहरातील वीरशैव गणेश मंडळ, श्री संस्थान कोरडे गणपती, नवरंग गणेश मंडळ, राष्ट्रीय गणेश मंडळ, शिवनेरी गणेश मंडळ, रूद्रा गणेश मंडळ, सिद्धीविनायक गणेश मंडळाची आरती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आली तसेच विविध गणेश मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरूण डाके, गणपत डोईफोडे, अशोक लोढा, सुभाष क्षीरसागर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, कोरडे गणपती येथे आगळावेगळा उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेशाच्या मंदिरात केलेली प्रार्थना वाया जात नाही. श्रीगणेशाला छप्पन भोग दाखवण्यात आला. गणेशोत्सव गेल्या 66 वर्षांपासून साजरा होत असून शहरात विविध गणेश मंडळे, धार्मिक इतिहासाचे देखावे साजरे करीत आहे. वीरशैव गणेश मंडळ सामाजिक आणि पुण्याचे काम करत आहे. गणेशोत्सवानिमित्त सामाजिक, उद्योगक्षेत्रातील लोकांना पुरस्कार सुरू केले. यात शिवशंकर रामलिंग कोरे व आई सामाजिक प्रतिष्ठान यांचा समावेश असून भारत भंडारे यांना युवा उद्योग पुरस्कार देण्यात आला. तसेच अमित शिराळे यांनाही गणेश मंडळाच्या वतीने युवा उद्योजक पुरस्कार देण्यात आला. काळे गल्ली येथे प्रा.जगदीश काळे यांच्या 73वा वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महिला, पुरूषांची उपस्थिती होती.
Back to top button