📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आदित्य कृषि महाविद्यालयाच्या कृषीदुतांकडून अंथरवन पिंपरी येथे कृषीदिनानिमित्त वृक्ष लागवड 

आदित्य कृषि महाविद्यालयाच्या कृषीदुतांकडून अंथरवन पिंपरी येथे कृषीदिनानिमित्त वृक्ष लागवड
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्नित व आदित्य शिक्षण संस्था, बीड संचलित आदित्य कृषि महाविद्यालयाचे कृषीदूत ,सुनील मदने, बाबासाहेब पल्हाळ, सचिन धुमाळ, गणेश ढोले, दयानंद सिरसट, योगेश मोरे, रेहान सय्यद, संदीप करडकर, श्रीदीप वळेकर, धीरज पवार, चैतन्य पाटील यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव २०२५-२६ अंतर्गत अंथरवन पिंपरी गावात ०१ जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंथरून पिंपरी येथील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने झाली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे कृषी क्षेत्रातील क्रांतिकारी योगदान यांविषयी कृषीदुतांनी मार्गदर्शन केले.  त्यानंतर कृषी  दिनाची पार्श्वभूमी, कृषी दिनाचे महत्त्व आणि कृषिप्रधान देशात कृषी दिन एक पावन पर्व म्हणून का ओळखला जातो या संदर्भात माहिती दिली. कृषी दिनानिमित्त कृषी दुतांकडून गावामध्ये वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी दुतांनी गावकऱ्यांना वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले तसेच झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी अंथरवन पिंपरी गावचे सरपंच शिवगंगा भाऊराव प्रभाळे उपसरपंच अशोक बन्सीधर शिंदे कृषी सहाय्यक ज्योती शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंथरवन पिंपरी चे मुख्याध्यापक राजकुमार थोरात , इतर शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी दूतांच्या या अभ्यास दौऱ्यास विद्यार्थ्यांना आदित्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आदितीजी सारडा मॅडम, आदित्य कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य कल्याण अपेट, प्राचार्य श्याम भुतडा, कार्यक्रम समन्वयक प्रा. वैभव शिंदे, कार्यक्रम अधिकारी डॉ. धनंजय सातपुते व महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
Back to top button