संपादकीय

राष्ट्रवादीच्या या नेत्यांच्या अडचणी वाढल्या, कोर्टात राहावे लागणार हजर

 

नगर | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांच्यावर एका प्रशासकीय महिला अधिकाऱ्याने आरोप लगावून एकच खळबळ उडवून दिली होती. आता त्या पाठोपाठ आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात मतदारांना खोटे आश्‍वासन देऊन व दिशाभूल करुन अहमदनगर एमआयडीसी येथील आयटी पार्क कार्यान्वीत केल्याप्रकरणी खोटे बोलण्याविरोधात आमदार संग्राम जगताप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांनी नगर जिल्हा न्यायालयात खाजगी दावा दाखल केला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार दिनांक 24/11/2021 रोजी जिल्हा मुख्य प्रधान न्यायधिश यांच्या समोर या अर्जावर सुनावणी झाली असता जिल्हा मुख्य प्रधान न्यायधिश यांनी आमदार संग्राम जगताप व त्यांचा प्रचार करणारे तरुण दिपाली शामसुंदर वर्मा,सोनाली रवींद्र भरताल,देवेंद्र अशोक वैद्य,संतोष क्षेत्रे,हरीश भोगाडे यांना कोर्टात हजर होऊन बाजू मांडण्याची नोटीस पारित केले आहे.

Back to top button