संपादकीय

सुनेत्रा पवारांनी घेतली राज ठाकरे आणि कुटुंबीयांची भेट

 

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आपल्या नवीन घरात राहायला गेले आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी ‘शिवतीर्थ’ या आपल्या नवीन निवासस्थानात गृहप्रवेश केला. नवीन घरात प्रवेश केल्यापासून राजकारणासह विविध क्षेत्रातील मंडळी राज ठाकरेंच्या नव्या घरी जाऊन त्यांची सदिच्छ भेट घेत आहेत. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे आणि कुटुंबाची भेट घेतली.

राज्याच्या राजकारणात वर्षा, मातोश्री आणि सिल्वर ओक या घरांना जितके महत्त्व आहेत, तितकेच महत्त्व मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानाला आहे. अलीकडेच दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला. राज ठाकरे हे कृष्णकुंजवर राहत होते. पण, त्यांनी कृष्णकुंजशेजारीच शिवतीर्थ हे घर बांधलं आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही राज ठाकरेंची भेट घेऊन भोजनाचा आस्वाद घेतला. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

यापूर्वी त्यांच्या भेटीला अनेक मेंबर येऊन गेले आहे काही दिवसांपूर्वी क्रिकेटर आणि राज ठाकरे त्यांचे जवळचे मित्र सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा भेट घेतली होती तसेच राज्यचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपत्नी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना आपल्या लेकीच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते.

Back to top button