ल.ना.होशिंग विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

ल.ना.होशिंग विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
प्राचार्य बाळासाहेब पारखे यांच्या हस्ते ध्वजारोहण
जामखेड प्रतिनिधी: दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी चे ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आठ तीस वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी केंद्रप्रमुख केशव गायकवाड तसेच दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ. सुनील कटारिया,संचालक दीपक होशिंग
उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने,उपप्राचार्य युवराज भोसले,पर्यवेक्षक अनिल देडे, मुख्यालिपीक ईश्वर कोळी,शिक्षक प्रतिनिधी पांडुरंग वराट,श्रीमती सुप्रिया घायतडक,ज्येष्ठ शिक्षक बबन राठोड,पोपट जगदाळे,मुकुंद राऊत,सतीश डुचे,विश्वनाथ आघाव राजेंद्र कोहक आदी पालक मान्यवर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
एनसीसी मधील गुणवंत विद्यार्थी तसेच एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले, एक मे महाराष्ट्र दिन,कामगार दिन याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.संस्थेचे सहसचिव आदरणीय डाॅ. सुनील कटारिया यांनी शाळा व संस्थेच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद, 2025-26 मध्ये शाळेला A प्लस दर्जा मिळाल्यामुळे प्राचार्य,उपप्राचार्य, उप मुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व सहकाऱ्यांचेअभिनंदन खूप कौतुक केले.
यावेळी विद्यालयातील गीत मंच व प्रमुख किशोर कुलकर्णी सर बाबासाहेब समुद्र यांनी छान गीत घेतले व
या कार्यक्रमासाठी राघवेंद्र धनलगडे,विशाल पोले,उमाकांत कुलकर्णी,लक्ष्मण साळुंखे,प्रल्हाद साळुंखे,बाप्पू जरे, धीरज पाटील,संजय जाधव,संतोष देशमुख,सांस्कृतिक विभाग प्रमुख नरेंद्र डहाळे सर यांनी यशस्वीपणे तयारी केली.सर्व अध्यापक, प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग सर्वांनी सहकार्य केले.



