संपादकीय

आगामी मुंबई महापालिका भाजप आरपीआय एकत्र युती करून लढणार

मुंबई | आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे तसेच सत्तेत असलेल्या सेनेला खाली खेचण्यासाठी भाजपने सुद्धा जोरदार तयारी सुरु केली असून दुसरीकडे कॉग्रेसने सुद्धा एकला चलो रे’चा नारा देत सेनेच्या अडचणी अधिक वाढवल्या आहेत.

त्यातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भाजप चे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी मुंबईत भेट घेऊन आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केली. तसेच रिपाई पक्षाला सुद्धा जास्त जागा देण्यात याव्यात या संदर्भात चर्चा केली.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत युती करून लढणार असल्याचे यावेळी चर्चा झाली असुन दोन्ही पक्षाचे युतीबाबत एकमत झाल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळात ना रामदास आठवले यांच्या समवेत अविनाश महातेकर; कृष्णमिलन शुक्ला; गौतम सोनवणे; एम एस नंदा आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button