संपादकीय

महाविकास आघाडी सरकारने दंगेखोरांना पाठीशी घातलं- जगदीश मुळीक

 

मागच्या काही दिवसांपासून काही दिवसांपूर्वी त्रिपुरा येथील घडलेल्या घटनेचं पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. अनेक शहरात या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्च्यांच्या दरम्यान मालेगाव , नांदेड व अमरावतीमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. या घटनेच्या निषेधार्थ भाजपनं आज पुण्यात धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

त्रिपुरा येथे मशीद पाडल्याची हिंसाचार घडल्याची खोटी अफवा पसरवत, महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावती येथे हिंसक धार्मिक दंगली घडवल्या. रझा अकादमीने मोर्चे काढत दंगली घडवण्यास पोषक वातावरणाची निर्मिती करत हिंसाचार घडवला. मात्र महाविकास आघाडी सरकारने दंगली घडवणाऱ्यांना पाठीशी घातलं. याउलट शांततेसाठी व स्वतः:च्या सरंक्षणासाठी रस्त्यावर उतरलेलया नागरिकांवर लाठीचार्ज करत खोटे गुन्हे दाखल केले. असा आरोप जगदीश मुळीक यांनी आंदोलना दरम्यान केला.

इतकंच नव्हे तर महाविकस आघाडीनं दंगेखोरांना पाठीशी घातलं महाविकास आघाडीमुळंच या दंगली महाराष्ट्रात होत आहेत. त्याचाच निषेध म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. या कृतीसाठी आम्ही महाविकास आघाडी सरकारचा निषेध करतो. असेही जगदीश मुळीक म्हणाले. या आंदोलनात युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारने घटनेतील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी या वेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Back to top button