संपादकीय

“एसटी कर्मचाऱ्यांनो, सावधान. सगळ्या पक्षांना खासगीकरण हवेच आहे”

 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मसिघय दोन महिन्यापासून कर्मचारी आंदोलन करत असून याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केल्या आहे. त्यातच आता या आंदोलनावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे,

महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांना एसटीचे खासगीकरण हवेच आहे. तेव्हा सावधान राहा, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला दिला आहे. सरकार कोणतेही असो, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या सगळ्या पक्षांना एसटी खासगीकरण पाहिजेच आहे. त्या सर्वांचे तसे प्रयत्न चालू आहे. त्यांना ती संधी एसटी कर्मचाऱ्यांनी मिळू देता कामा नये, असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

तर दुसरीकडे एसटी संप मिटविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासी कराचा फॉर्म्यूला सांगितला आहे, त्यावर महाविकास आघाडी सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. तो फॉर्म्युला आम्ही गांभीर्याने घेतला आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

Back to top button