संपादकीय

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार की नाही? मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात की,

 

राज्यात एकीकडे जनता कोरोनाच्या संसर्गाने त्रस्त असताना अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे तर दुसरीकडे अनेकांच्या नोकऱ्या लॉकडाऊनमुळे हिरावून घेतल्या आहेत तसेच दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत याच पार्श्वभूमीवर वाढत्या इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने इंधनावरील दर कमी केले होते त्यातच आता राज्य सरकारने सुद्धा दर कपात करावी अशी मागणी होत होती यावर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकार कर कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याचे जीएसटीचे 50 हजार कोटी रुपये केंद्राने अद्याप दिले नसल्याचे त्यांनी म्हटले.

इगतपुरी तालुक्यात काँग्रेसच्यावतीने इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात आज सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. त्यावेळी झालेल्या सभेनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाळासाहेब थोरात म्हणाले की, इंधन दरवाढीचा आम्ही विरोध केला आहे. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर इंधनावरील करात वाढ केली आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे 50 हजार कोटी केंद्राने अद्यापही दिले नाहीत. कोरोनामुळे उत्पन्न घटले असून पगार देण्यासाठीही कर्ज काढावे लागत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

भाजपकडून एसटी आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. सरकारी सेवेत घ्यावे अशी त्यांची मागणी आहे. मात्र, हा निर्णय घेणे कठीण असल्याचे थोरात यांनी म्हटले. राज्यात भाजपची सत्ता असताना त्यांनी एसटीचे विलीनीकरण केले नाही. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घेणे शक्य नसल्याचे भाजपच्या तत्कालीन प्रमुख मंत्र्याने म्हटले होते. आता भाजप आंदोलन करत असल्याचे थोरात यांनी म्हटले

Back to top button