बीड
चौकशी फक्त अधिकाऱ्यांचीच का? मंत्र्यांचीही व्हावी – नागरिकांचा सवाल

चौकशी फक्त अधिकाऱ्यांचीच का? मंत्र्यांचीही व्हावी – नागरिकांचा सवाल
भंडारा :भ्रष्टाचाराच्या कूरणावर गाजला सवाल, महसूल अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करा! , नागरिकांच्या थेट सवाल अधिकाऱ्याची संपत्ती पारदर्शक करा .या प्रकाराची बातमी दैनिक महाराष्ट्र सूर्योदयमध्ये प्रसिद्ध झाल्याने भंडारा ,जिल्ह्यातून नागरिकांच्या चर्चेतून थेट सवाल झाल्याने. नागरिकाच्या चर्चेला पेव फुटले आहे.या देशातील भ्रष्टाचाराविरोधात विविध स्तरावर आवाज उठत असतानाच, आता सामान्य नागरिकांनी थेट मंत्र्यांवर आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवरही चौकशीची मागणी पुढे केली आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका संदेशातून ही भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. त्या संदेशात म्हटले आहे की, “चौकशी फक्त अधिकाऱ्यांच्या, फक्त मंत्र्यांच्या पण करा ना, अखंड भारत देशातील भारत देश कर्जमुक्त होईल…” अशी भावना व्यक्त करण्यात आली.
पुढे यात लिहिले आहे की, “भारतीय जनतेसाठी, मानवतेसाठी कधीही मेलो तरी चांगलं, पण गप्प बसून जिवंत राहण्यापेक्षा हा आवाज उठवणं महत्त्वाचं आहे.”
यातून नागरिकांचा उद्रेक दिसून येत असून, भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालण्यासाठी केवळ अधिकारीच नव्हे तर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी यांचीही चौकशी व्हावी, अशी स्पष्ट मागणी होताना दिसते.
या संदेशाने सामान्य माणसाच्या मनातील भावना अधोरेखित केल्या आहेत.



