बीड

शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने दांम्पत्य हस्ते महाआरती

शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने दांम्पत्य हस्ते महाआरती

श्री दुर्गा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी-जामखेड शहरातील बाजार तळ येथील भाविक भक्तांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री दुर्गा माता मंदिर येथे घटस्थापना करून नवरात्र उत्सव सुरू झाला.पहिल्या माळेला मंदिर ट्रस्ट चे सचिव तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने व त्यांच्या सौभाग्यवती सौ.वर्षा कैलास माने यांच्या हस्ते देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली. यावेळी पहिल्याच दिवशी या आरतीसाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. माने म्हणाले की सालाबादाप्रमाणे याहीवर्षी दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या आयोजनातून चांगला उत्सव संपन्न होणार असून विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येत आहे,तसेच या मंदिरांच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू असून विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांनी तीस लाख रुपयेंचा निधी उपलब्ध करून दिला असून काम प्रगतीपथावर असून पुढील कामांसाठी लोकवर्गणी करणे आवश्यक असल्याने शहरातील दानशूर दात्यांनी मंदिरासाठी मदत करून आपल्या शहरातील दुर्गा देवीचे मंदिर व परिसराच्या विकास व्हावा,यासाठी सढळ हाताने मदत करून ट्रस्टला सहकार्य करावे जेणे करून आपल्या शहरातील हे मंदिराच्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडुन भाविक भक्तांची याठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था होईल असे अवाहन केले.
यावेळी मंदिर ट्रस्ट चे राजू पवार, रवि वडे,ॲड. विकास पवार, राहुल मोरे, अमोल मोरे, महेश कटारिया, आशितोष बिडकर, दत्ता पवार, बालाजी मोरे, मल्लिकार्जुन पवार, प्रकाश पवार, बंडू डांगरे, नामदेव जगदाळे, मयूर पवार, मंगेश मोरे, किरण साळुंके आदी भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उत्सवा मध्ये बंडू काका जोशी (पुजारी) देवीची आरतीसह इतर कामे पाहतात.

Back to top button