बीड

तुळजापूर ते जामखेड पायी ज्योतचे महेंद्र राळेभात यांच्या वतीने भव्य स्वागत

तुळजापूर ते जामखेड पायी ज्योतचे महेंद्र राळेभात यांच्या वतीने भव्य स्वागत

शिवक्रांती मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी – जामखेड शहरातील शिवक्रांती मित्र मंडळ, शिक्षक काॅलनी येथे सालाबादप्रमाणे यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री क्षेत्र तुळजापूर ते जामखेड पायी ज्योत आणले.माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी (काका) राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते महेंद्र (काका) राळेभात मित्र परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. ज्योत ही गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे.देवीची ज्योत घेऊन जामखेड शहरात ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी शहरातील भाविक भक्तांनी उत्साहात स्वागत केले.तसेच ज्योतीचे पूजन,हार पुष्प वाहून पूजा करण्यात आली.
यावेळी नगरसेवक भाऊराव राळेभात,खंडू कांबळे, लक्ष्मण माने, गजानन राळेभात,तानाजी राळेभात, विनोद जंगम,प्रणव राळेभात,आदेश भिसे, संदीप भुजबळ,शरद यादव,जुबेर सय्यद,शेलार मामा, सुरज राळेभात,शंकर डाडर,भगरी मड्डी,राहुल शिंदे,राहुल नाईक, संतोष ढमाले,शुभम डोके,अवि ओव्हळ,सचिन नंदिरे,सार्थक बागल,ओमकार माने,समर्थ राळेभात,सार्थक राळेभात,सुरज राळेभात,करण घोडेस्वार,ओमकार घोडेस्वार,अशोक भिसे,गोकुळ पवार,यश राऊत,साहिल मणियार,दादा डोके,श्री राळेभात,स्वराज मोहिते,उमेश राऊत,उमेश राळेभात,भूषण राळेभात,प्रशांत घायतडक,किरण भिसे आदी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महेंद्र राळेभात म्हणाले, नवरात्र उत्सवात नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कलागुणांना वाव मिळावा यासाठी माता भगिनी ंसाठी खेळ पैठणी तसेच लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा विविध स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी सहभाग नोंदवावा.

Back to top button