बीड
चिंचाळ्याच्या जि.प शाळेत भर उन्हात शालेय पोषण आहार शिजवणार्या महिलांचा छळ

चिंचाळ्याच्या जि.प शाळेत भर उन्हात शालेय पोषण आहार शिजवणार्या महिलांचा छळ
शाळेतील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मनमानी कारभारामुळे संताप.
15 जुन 2026 रोजी जि.प.कें. प्रा. शाळा चिंचाळा ता.वडवणी जि .बीड या ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष 2026-2027 सुरुवात झाली मात्र भर उन्हात शालेय पोषण आहार शिजवणार्या महिलांचा छळ शाळेतील शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या मनमानी कारभारामुळे पोषक आहार शिजवणार्या महिलांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील गॅस शाळा सुरू होण्यापूर्वीच संपलेला असल्यामुळे शाळेतील शिक्षकांनी पोषण आहार शिजवणार्या महिलांना गॅस भेटत नाही तो भरुन आणण्यासाठी निधी नाही असे उडवा उडवीचे उत्तरे शिक्षकांकडून या महिलांना दिले जात आहेत.शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने महिलांना चुलीच्या धुरामुळे किचन खराब होते धुरामुळे भिंती पत्रे काळे पडण्याची कारणे देऊन भर उन्हातच चुल मांडुन शालेय पोषण आहार बनवण्याची तंबी दिली आहे.
जुनचा पंधरवडा उलटुन गेला असला तरी उन्हाची लाट आणि तापमानाचा पारा वाढलेला असतानाही अश्या प्रकारे भर उन्हात सावलीची सोय न करता गैरसोयीच्या ठिकाणी शालेय पोषण आहार शिजवण्यास भाग पाडले जात आहे.
इतकेच नव्हे तर क्षुल्लक कारणावरून त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, विनाकारण मानधनात कपात करण्याची धमकी देणे आणि जास्तीचे कामे करायला लावणे तसेच कामावरून काढुन टाकण्याची धमकी शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सर्सास सुरू आहे.
त्या महिलांच्या मार्फत अॅड राहुल पायके यांनी वडवणी गटविकास अधिकारी नागरगोजे साहेब यांना या प्रकारणा संदर्भात भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली असता हे काम माझे नाही शिक्षणाधिकारीचे आहे असे बोलून त्यांनी त्याची जबाबदारी झटकुन टाकली उन्हात आहार शिजवला तर माणुस मरत असते का अश्या प्रकाराची उत्तरे दिली .
बीड जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांना या प्रकारात संदर्भात माहिती दिली असता त्यांनी वडवणी गटशिक्षणाधिकारी यांना प्रत्यक्ष शाळेवर पाठवून अहवाल मागवुण कारवाईचे आश्वासन दिले आहे.
या सर्व प्रकारामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे



