📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जिल्हाधिकाऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी – ॲड.डॉ. अरुण (आबा) जाधव

जिल्हाधिकाऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी – ॲड.डॉ. अरुण (आबा) जाधव

जामखेड प्रतिनिधी – गेली आठ-दहा दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे यामध्ये शेती पिके, घरे, जनावरे, मनुष्यहानी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्जत-जामखेड तालुक्यातील काही गावांमध्ये झालेली आहे,
कर्जत तालुक्यातील सीना नदीच्या पट्ट्यातील गावांना खूप मोठा महापुराचा तडाका बसला आहे यामध्ये अनेक घरे उध्वस्त झालेली आहेत जनावरे गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या देखील पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत अशा प्रकारे शेतकऱ्यांची हानी झालेली आहे खूप मोठ्या फळबागांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत हातात तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास पाण्यामध्ये वाहून गेला आहे शेतकऱ्यांकडे फक्त डोळ्यात पाणी उरले आहे. प्रशासनानी एवढी देखील कठोरता बाळगू नये, भारत देश हा किसान प्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु आजच या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी ह्या सरकारला वेळ नाही,
एवढं मोठं राज्यातील बळीराजावरती संकट आलेलं असताना देखील सरकार शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनामे देखील करायला तत्परता दाखवत नाही हे या राज्याचे खूप मोठे दुर्दैव आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करुन भुसार पिकाचे कर्ज माफी करावी, दोन्ही तालुक्यातील काही गावांनी अनेक ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस झालेला असून त्या ठिकाणी वढ्हे, नाले, नद्या, तुडुंब भरून वाहत आहेत यामध्ये अनेक घरांचे खूप मोठे नुकसान झाले आहे जनावरांना निवाऱ्याची व्यवस्था नाही खूप मोठे कांदा चाळीचे नुकसान झालेले आहे शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झालेली आहे सतत पाऊस चालू असल्यामुळे लोकांना व जनावरांना देखील साथीच्या आजारांची खूप मोठी पसरण होत चाललेली आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी साहेबांनी आरोग्य विभागाचे अधिकारी पशुधन विभागाचे अधिकारी व इतर विभागाचे प्रशासकीय अधिकारी यांनी तात्काळ या लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे कारण त्यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी देखील पैसे उरलेले नाहीत हे शासनाने लक्षात घेऊन या लोकांना सांभाळण्याची जबाबदारी मायबाप सरकारने घ्यावी.
या सर्व बाबी लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ.अरुण (आबा) जाधव यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना आव्हान केले आहे, की तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वतोपरी नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर करावी हि विनंती.

Back to top button