बीड
महिलेवर रॉकेल टाकून जाळून हत्या केल्याप्रकरणी नवरा व दिराला सत्र न्यायालयाने ठोठावलेली आजन्म कारावासाची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द.. मृत्यूवर जबाब धरले नाही गृहीत…

महिलेवर रॉकेल टाकून जाळून हत्या केल्याप्रकरणी नवरा व दिराला सत्र न्यायालयाने ठोठावलेली आजन्म कारावासाची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द.. मृत्यूवर जबाब धरले नाही गृहीत…
छत्रपती संभाजीनगर :- मयत मनीषा फाळके हिचा विवाह आरोपी क्रमांक 1 शहाजी यांच्या सोबत आठ वर्षांपूर्वी झाला झालेला होता. सदर लग्नापासून दोघांना चार अपत्य ही झाली. लग्नानंतर मयत मनीषाने घरगुती जमिनीच्या वाटपावरून वाद सुरू केले. सदरील राग अनावर झाल्याने 13 मे 2016 च्या सकाळी आरोपी क्र.1 नवरा नामे शहाजी आश्रुबा फाळके व आरोपी क्र.2 दीर नामे बबन आश्रुबा फाळके हे मयत झोपलेल्या खोलीत घुसले. मयत झोपेत असताना नवऱ्याने मयताच्या अंगावर रॉकेल टाकले तसेच दिराने जळती काडी मयताच्या अंगावर ओढून मयताला पेटून दिले. शेजारच्या लोकांनी पिडीतेला सरकारी दवाखान्यात दाखल केले असताना पिडित महिलेचा मृत्यूपूर्व जवाब पोलिसांनी तसेच तहसीलदार यांनी नोंदवला. पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास पूर्ण केला आणि आरोपपत्र माननीय सत्र न्यायालय बीड येथे दाखल केले. माननीय सत्र न्यायालयाने मृत्यूपूर्व जबाब गृहीत धरून आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर आरोपींनी ऍड.शशिकांत शेकडे यांच्या मार्फत माननीय उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये अपील दाखल केले होते. माननीय खंडपीठामध्ये मध्ये सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी मयतेचा मृत्यूपूर्व जबाब योग्य पद्धतीने नोंदवला गेले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सदरील जबाबात काही प्रमाणात भिन्नता होती तसेच मयताचा अंगठा भाजलेला असताना जबाबावर मयतेच्या ठसे येऊ शकत नाहीत असा बचाव आरोपीच्या वकिलांनी घेतला. आरोपीच्या वकिलांचा बचाव ग्राह्य धरून माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठाने आरोपींना दिलेली आजन्म कारावासाची शिक्षा रद्द करून आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात जेष्ट ऍड. राजेंद्र देशमुख, ऍड.शशिकांत शेकडे यांनी काम पाहिले तसेच त्यांना ऍड.रोहित नरवडे, ऍड. विशाल थावरे, ऍड.व्यंकटेश हिंगमिरे आणि नितीन राठोड यांनी सहकार्य केले.


