बीड

माहिला शिवजन्मोत्सव समिती आयोजित ; जामखेड येथे भव्य ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन

माहिला शिवजन्मोत्सव समिती आयोजित ; जामखेड येथे भव्य ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी – दि.१७माहिला शिवजन्मोत्सव समिती आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त दि.१८ मार्च २०२५ रोजी जगदंब प्रतिष्ठान, राजमुद्रा युवा मंच व शंभुसुर्य मर्दानी आखाडा यांच्या सहकार्याने युगंधर शस्त्रसंग्रह करकंब यांचे भव्य ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.सकाळी ९.०० ते सायंकाळी ९.०० वा.या वेळेत भव्य शस्त्र प्रदर्शन होणार आहे.

या प्रदर्शनात तलवारींचे विविध प्रकार, कुंत, दांडपट्टा, जांबिया, वाघनख, खंजीर, चिलखत, तोफगोळे, तेगा, दस्तान, अंकुश, जुल्फिकार, वीटा,मराठा धोप, गेंड्याच्या कातडीची ढाल, कासवाची ढाल, अडकित्याचे असंख्य प्रकार, राजाराणी खंजीर, त्रिमुखी खंजीर, चंद्रभान, कट्यारी, हस्तीदंताचे खंजीर, चिलखते, कुऱ्हाडी, बंदूक, माडू अशा असंख्य प्रकारांची ऐतिहासिक,शिवकालीन शस्त्रे तसेच पुरातन नाणीसंग्रह पाहण्याची सुवर्ण संधी आपणास रोहिणीताई संजय काशिद आयोजक महिला शिवजन्मोत्सव समिती जामखेड यांनी उपलब्ध करून दिली आहे तरी परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, माता भगिनी यांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button