बीड

महिला शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने लिंबागणेशच्या भालचंद्र  विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप

महिला शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने लिंबागणेशच्या
भालचंद्र  विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप

प्रतिनिधी । लिंबागणेश:
(पुण्याच्या कात्रज येथील महिला शक्ती प्रतिष्ठाणच्या वतीने बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे  नुकतेच वाटप करण्यात आले.
आयोजीत  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य किसन सावंत हे उपस्थीत होते. यावेळी  प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आरती गणाचार्य, विश्वस्त अरुण गणाचार्य, उर्मिला मानकर , डॉ. कृष्णा मानकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास बॉक्स व वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपक्रम पाहुन प्राचार्य सावंत यांनी  महिला शक्ती प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी माजी प्राचार्य दत्तात्रय मानकर यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याचे व दिलेल्या साहित्याचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन केले.
यावेळी शाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे शैक्षणिक बळ मिळत असून समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  शाळा प्रशासन व महिला शक्ती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Back to top button