बीड

आज 13 फेब्रुवारीपासून ‘महा पशुधन एक्सपो 2026’ ला भव्य प्रारंभ

आज 13 फेब्रुवारीपासून ‘महा पशुधन एक्सपो 2026’ ला भव्य प्रारंभ
 *_पूर्वतयारीचा मा. डॉ. प्रवीणकुमार देवरे आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी घेतला आढावा_*
बीड दि. 15 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महा पशुधन एक्सपो 2026’ या भव्य व ऐतिहासिक पशुधन प्रदर्शनाचा शुभारंभ उद्या दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी परळी वैजनाथ येथे होत असून, प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा मा. डॉ. प्रवीणकुमार देवरे, आयुक्त पशुसंवर्धन यांनी मौजे परळी वैजनाथ, जि. बीड येथे प्रत्यक्ष भेट देऊन घेतला.
यावेळी प्रदर्शनस्थळावरील सर्व विभागांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. एक्सपोमध्ये कर्नाटक मधून अमृत महल व हालीकर जातीचे गोवंश तसेच बन्नूर जातीची मेंढी, तेलंगणा मधून ओंगोल तर उत्तर प्रदेश मधून बारबरी व जमुनापारी जातीच्या शेळ्या अशा विविध राज्यांतील तसेच महाराष्ट्रातील जातीवंत पशुधनाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला गेला असून, पशुधन प्रदर्शनस्थळी दाखल होत आहेत.
पशुधनासाठी उत्कृष्ट सुविधा
प्रदर्शनात सहभागी झालेल्या पशुधनासाठी
 • प्रशस्त निवास व्यवस्था
* स्वच्छ पिण्याचे पाणी
* चारा व खाद्य व्यवस्था
* पशुवैद्यकीय तपासणी व आरोग्य सुविधा
* सुरक्षा व्यवस्था
अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व कर्मचारी व अधिकारी अखंडित सेवा देत असून, व्यवस्थापन सुस्थितीत आहे.
*विशेष आकर्षणे*
या एक्सपोमध्ये
* दुग्ध स्पर्धा (Milk Competition)
* आकर्षक डॉग शो
* विविध जातींचे भव्य प्रदर्शन
यांचे आयोजन करण्यात आले आहे.
300 कंपन्यांचे भव्य स्टॉल्स,   राज्य व देशभरातील एकूण 300 विविध कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले असून, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, चारा व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योग यासंबंधित उत्पादने व तंत्रज्ञान येथे उपलब्ध असणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील अधिकाऱ्यांनी विविध राज्यांना भेट देऊन सहभागी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
*तांत्रिक चर्चासत्रे*
तीन दिवस चालणाऱ्या या एक्सपोमध्ये
* एकूण 25 तांत्रिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
* पशुधन आरोग्य, आधुनिक तंत्रज्ञान, डेअरी व्यवस्थापन, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, प्रक्रिया उद्योग इत्यादी विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
*सांस्कृतिक कार्यक्रम*
प्रदर्शन काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पशुपालक व नागरिकांना मनोरंजनासह माहिती देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
400 पेक्षा अधिक अधिकारी कार्यरत
संपूर्ण आयोजनासाठी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. शीतलकुमार मुकणे, अतिरिक्त आयुक्त यांचेसह 400 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी मागील तीन दिवसांपासून अखंडितपणे कार्यरत असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे.
*10 लाखांहून अधिक पशुपालकांची उपस्थिती अपेक्षित*
या भव्य प्रदर्शनाला राज्यभरातून तसेच इतर राज्यांतून 10 लाखांपेक्षा अधिक पशुपालक व नागरिक भेट देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या महोत्सवाचे नियोजन मंत्री पशुसंवर्धन पंकजाताई मुंडे तसेच सचिव पशुसंवर्धन डॉ. एन. रामस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व शेतकरी, पशुपालक, दुग्धव्यवसायिक व पशुपालन क्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी या ऐतिहासिक प्रदर्शनास भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञान व संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
*****
Back to top button