भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समिती चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समिती चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मुंबई येथे मंत्रालयासमोरील धरणे आंदोलनास पाठिंबा, स्वतंत्र मंत्रालयाच्या मागणी
अहिल्यानगर प्रतिनिधी –भटक्या, विमुक्त समाजाला स्वतंत्र मंत्रालय स्थापन, स्वतंत्र मंत्री नेमावा, त्यांना अट्रोसिटी ॲक्टचा लाभ लागू करावा तसेच ३१ ऑगस्ट ‘भटके-विमुक्त दिन’ म्हणून घोषित करावा, या प्रमुख मागण्यांसाठी मंत्रालयासमोर (मुंबई) आजपासून धरणे आंदोलनास सुरूवात झाली.
या आंदोलनास जामखेड, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यांतील प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला असून, अहिल्यानगर येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारकडे ठोस मागणी करण्यात आली.
यावेळी बापूसाहेब ओव्हळ,लता सावंत,तुकाराम पवार, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिष पारवे,भिमराव सुरवसे,ललिता पवार,काजुरी पवार,रजनी बागवान,डिसेना पवार,राहुल पवार,रंजित मेघडंबर, मच्छिंद्र जाधव, ऋषिकेश गायकवाड,सारिका गोंडे,नरसिंग भोसले,पल्लवी शेलार आदी ग्रामीण विकास केंद्र,लोक अधिकार आंदोलन, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बापूसाहेब ओव्हळ यांनी सांगितले की, विमुक्त-भटक्या समाजाच्या मूलभूत अधिकारांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल.
राज्यभरातून समाजबांधव आंदोलनात सहभागी होत असून, मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



