सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
दिघोळ–माळेवाडी पुलासाठी ८ कोटींचा निधी मंजूर
जामखेड प्रतिनिधी : जामखेड तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे दिघोळ–माळेवाडी ग्रामीण मार्गावरील मांजरा नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी नाबार्ड अंतर्गत ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हा पूल उभारल्यानंतर ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुरक्षित व वेगवान होणार असून, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार व व्यापारी वर्गाचा प्रवास सुलभ होईल. पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी व अडचणी दूर होऊन जामखेड तालुक्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, या निधी मंजुरीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.