आषाढी एकादशीनिमित्त बालगोपाळांची वाचनदिंडी.

आषाढी एकादशीनिमित्त बालगोपाळांची वाचनदिंडी.
शेवगाव:-जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बालम टाकळी येथील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी मिळून वाचन दिंडीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी व गावातील ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. वाचनाचे जीवनातील महत्त्व व वृक्षांचे महत्त्व दिंडी मार्फत विविध घोषणा देऊन जनजागृती केली. गावातील भजनी मंडळ यांनी दिंडीला मोलाचे साथ दिली. गावामध्ये ठिकठिकाणी दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दिंडीमध्ये छबुकाका परदेशी, आसाराम शिंदे, पप्पू शिंदे, वाघुंबरे नाना, बाळासाहेब घोरपडे, प्रभाकर गवंडर आदी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शाळेच्या या उपक्रमाबद्दल सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया कवडे व शाळेचे सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. बोधेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. गाडेकर साहेब व गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ मॅडम यांनी शाळेचे कौतुक केले.



