बीड

तालुकास्तर क्रीडा स्पर्धेत तेलंगशी शाळेचे उल्लेखनीय यश वैयक्तिक स्पर्धेत 5 तर सांघिक स्पर्धेत 3 बक्षिसे

तालुकास्तर क्रीडा स्पर्धेत तेलंगशी शाळेचे उल्लेखनीय यश
वैयक्तिक स्पर्धेत 5 तर सांघिक स्पर्धेत 3 बक्षिसे

जामखेड प्रतिनिधी – दि.१६ जामखेड तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत तेलंगशी(खर्डा )शाळेने उल्लेखनीय यश मिळवले असून शाळेस वैयक्तिक 5 तर सांघिक 3 बक्षिसे मिळाली आहेत.
धावणे स्पर्धा व लांब ऊडी स्पर्धा लहान गट मुली यातून तृप्ती बाळासाहेब पाटील तर लांब ऊडी लहान गट मुले यात अनिश पांडुरंग मोरे यांनी उत्कृष्ठ खेळ दाखवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून नेवासा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत स्पर्धेत उत्तम कामगिरी केली.
धावणे स्पर्धा मोठा गट तेजस सुखदेव मोरे तृतीय,लांब उडी मोठा गट गणेश केशव जायभाय तृतीय क्रमांक घेऊन चमकदार कामगिरी केली आहे.सांघिक स्पर्धा कबड्डी मोठा गट मुली व खो-खो स्पर्धा मोठा गट मुली या दोन्ही संघानी नेञदिपक कामगिरी करुन उपविजेता संघ म्हणजेच द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या सर्व खेळाडूंना लक्ष्मी जायभाय, अशोक जाधव,विजयकुमार रेणुके,रविंद्र धस,विकास पाचरणे ,सुशेन चेंटमपल्ले, मुख्याध्यापक संतोष गोरे यांच्यासह अनंता गायकवाड,प्रा.राजू म्हेञे,रामचंद्र पाचरणे व राजाभाऊ राठोड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शिक्षक व विद्यार्थी यांचे तेलंगशी गावचे सरपंच दिगंबर ढाळे,शा.व्य.स.अध्यक्ष रेवननाथ ढाळे,अण्णासाहेब काळे,मुकेश मोरे,किशोर जावळे,केंद्रप्रमुख केशव गायकवाड,विस्तारअधिकारी संजय नरवडे , जालिंदर खताळ,गटशिक्षणाधिकारी विजय शेवाळे , गटविकासअधिकारी शुभम जाधव यांच्यासह ग्रामस्थ,पालक व शिक्षक यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Back to top button