बीड

शुक्रवारी बीडमध्ये मोफत मूळव्याध तपासणी शिबिर महिलांसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती बीडच्या सुश्रुत मूळव्याध हॉस्पिटलचा उपक्रम

शुक्रवारी बीडमध्ये मोफत मूळव्याध तपासणी शिबिर
महिलांसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती बीडच्या सुश्रुत मूळव्याध हॉस्पिटलचा उपक्रम

बीड । प्रतिनिधी:-मुळव्याधाच्या रुग्णांसाठी मूळव्याध तज्ज्ञ डॉ. अमोल खेत्रे यांनी बीडमध्ये मोफत मूळव्याध तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवार दि. २५ एप्रिल २०२५ रोजी केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टिम पूर्णपणे मोफत तपासणी करणार आहे. विशेष म्हणजे महिलांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे. हे शिबीर बीड शहरातील जालना रोड येथील सुश्रुत मूळव्याध हॉस्पिटल येथे होणार आहे. शिबिरातील रुग्णांना औषध उपचारातही सुट देण्यात येणार आहे.
मुळव्याध-भगंदर-फिशरचे लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. तपासणी न केल्यामुळे मूळव्याध हा आजार वाढतच जातो. आणि त्याचे दुष्परिणाम भविष्यात रुग्णांना सहन करावे लागतात. सुश्रुत मूळव्याध हॉस्पिटल बीडच्या वतीने मुळव्याध- भगंदर-फिशरची मोफत तपासणी शुक्रवार दि. २५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत करण्यात आले आहे. बीड शहरातील जालना रोड येथील डी.सी. लोढा कॉम्लेक्स, मंत्री बँकेच्या शेजारी असलेल्या सुश्रुत मूळव्याध हॉस्पिटल येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मुळव्याध-भगंदर-फिशर याचे लक्षणे मलप्रवृत्तीच्या वेळेस किंवा नंतर रक्त पडणे, शौच्याच्या जागेवर आजुबाजुला गाठ येणे, त्यामधून चिकट स्त्रव व रक्त येणे, शौचाच्या जागी आग होणे, वेदना होणे, टोचल्यासारखे वाटणे, शौचाच्या वेळेस मांसल गोल आकाराचा भाग बाहेर येणे इत्यादी लक्षणे असल्यास त्याची तत्काळ तपासणी करुन त्यावर निदान करता येते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार बळावतो. त्यासाठी तपासणी करुन घेणे अत्यंत गरजेचे आहे. या हॉस्पिटलमध्ये गुदगत आजारांसाठी क्षारसुत्र, क्षारकर्म, आग्रिकर्म सुरक्षित आयुर्वेदिक उपचार पध्द्ती उपलब्ध आहेत. या शिबिरामध्ये फोनवरही नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी रुग्णांनी डॉ. सौ. शिल्पा खेत्रे ८६००२८७९७२, डॉ. अमोल खेत्रे ७५१७७४७९७२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे असे आवाहन डॉ. अमोल खेत्रे यांनी केले आहे.

Back to top button