पुस्तके चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन- कृष्णा वखारे एमआयडीसी उद्योजक ग्रुप तर्फे पुस्तक दिन साजरा

पुस्तके चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन- कृष्णा वखारे एमआयडीसी उद्योजक ग्रुप तर्फे पुस्तक दिन साजरा
अहिल्या नगर/प्रशांत बाफना – आजच्या इंटरनेट युगात देखील पुस्तकांचे महत्त्व कायम आहे.पुस्तकाच्या माध्यमातून लेखक ज्ञानाचा प्रकाश पसरवतात.पुस्तक लिहिणारे लेखक या जगातून गेले तरी पुस्तक मात्र कायम राहते. पुस्तके ही चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहे. या पुस्तकांमधूनच देशातील ऐक्याचा धडा शिकविता येतो, पुस्तकांद्वारे आपल्याला नवीन प्रेरणा, दिशा मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचली पाहिजेत.ज्ञान प्राप्त करण्याचा हा चांगला, सोपा व स्वस्त मार्ग आहे.असे प्रतिपादन उद्योजक कृष्णा वखारे यांनी केले आहे. अहिल्यानगर येथील एमआयडीसी उद्योजक ग्रुप तर्फे राहुरी तालुक्यातील शेणवडगाव या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या आदिवासी मुलांना वाचनासाठी पुस्तक दिनानिमित्त पुस्तके भेट दिली. याप्रसंगी उद्योजक अशोक पानसरे,करण पांचरीया,प्रमोद कुमार छाजेड,अनिल लोढा, नितीन गीते, संजय सुरसे आदी उपस्थित होते. राहुरी तालुक्यातील शेणवडगाव येथील पहिली ते चौथीपर्यंत 50 विद्यार्थी जिल्हा परिषदेचे शाळेत शिक्षण घेतात या परिसरातील ही सर्व मुले आदिवासी भागातील आहे.या सर्वांना पुस्तकांबरोबरच सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे शाळेत पायी जा – ये करतात त्यामुळे उद्योजक ग्रुप तर्फे सर्वांना फुटवेअर देखील देण्यात आल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. श्री.वखारे पुढे म्हणाले शाळेचे भौतिक वातावरण प्रसन्न करणारे आहे. आधुनिक युगात मुलांना वाचण्याची सवय लागावी म्हणून शिक्षक घेत असलेले कष्ट कौतुकास्पद आहे. भविष्यात शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी कुठलीही मदत लागल्यास एमआयडीसी उद्योजक समूह तत्पर असेल. असे वखारे यांनी सांगितले. यावेळी शिक्षक गिरीधर जाधव, सागर शिंदे,शरद जाधव, अनिल तुवर,परसराम जाधव उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षिका दिपाली पुराणिक यांनी केले तर मुख्याध्यापक रवींद्र शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. प्रसिद्धीकरिता – विजय मते फोटो ओळी-अहिल्यानगर येथील एमआयडीसी उद्योजक ग्रुप तर्फे पुस्तक दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी कृष्णा वखारे,अशोक पानसरे, करण पांचरीया, प्रमोदकुमार छाजेड, अनिल लोढा, नितीन गीते,संजय सुरसे मुख्याध्यापक रवींद्र शिंदे, शिक्षकवृंद आदी



