सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन
नगरसेविका नंदाताई होळकर यांचा सामाजिक उपक्रम
जामखेड | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती मा.ना.प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथे मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन प्रभाग क्रमांक सात च्या नगरसेविका सौ. नंदाताई प्रविण होळकर यांच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हे मोफत दंत तपासणी शिबिर,साधना दातांचा दवाखाना या ठिकाणी रविवार, दि.४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत
शहरातील सरकारी दवाखाना समोर, बीड रोड, जामखेड येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात दातांची तपासणी, दात स्वच्छ करणे, दात काढणे, लहान मुलांचे दंत उपचार, दातांवरील कीड उपचार तसेच दंत आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या शिबिरात डाॅ. श्रृती रोहित देशमुख
(B.D.S., MUHS) या सेवा देणार असून सर्व उपचार पूर्णतः मोफत असणार आहेत.
सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा जामखेड शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आयोजक तथा नगरसेविका नंदाताई प्रविण होळकर यांनी आवाहन केले आहे.



