बीड
नवचेतना फाऊंडेशन धारूर च्या वतीने आदर्श महिलांचा सन्मान.

नवचेतना फाऊंडेशन धारूर च्या वतीने आदर्श महिलांचा सन्मान.
तेलगांव – जागतिक महिला दिनानिमित्त नवचेतना फाऊंडेशन धारूर च्या वतीने कष्टकरी, कामगार महिलांचा सन्मान करण्यासाठी मौजे बोडखा येथे आदर्श महिलांचा सन्मान करण्यासाठी सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य,समाजसेवा, नृत्य आणि अभिनय या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मिरा अशोक तिडके (सरपंच बोडखा ) तर प्रमुख पाहुणे म्हणून वैभवी टाकणखार (राष्ट्रीय कथ्थक नृत्यकला ) या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व गावातील तरुण मुली वेगवेगळ्या वेशभूषेत आपल्या कला सादर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होत्या हे या कार्यक्रमाचे आगळेवेगळे स्वरुप दिसून येते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात सौ.मिरा तिडके यांनी सांगितले की.नवचेतना फाऊंडेशन धारूर या संस्थेच्या माध्यमातून निकीताताई तिडके या नेहमीच तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे आमच्या गावांचे नाव उज्ज्वल केले आहे याबरोबरच सर्व क्षेत्रातील महिला पुढे यायला हवे हाच एकमेव संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून जातो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश गटकळ सरांनी केले तर आभारप्रदर्शन या कार्यक्रमाच्या आयोजक श्रीमती निकिता ताई तिडके यांनी केले.


