बीड

क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटविण्याची विश्व हिंदू परिषदेचे मागणी

क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटविण्याची विश्व हिंदू परिषदेचे मागणी

जामखेड प्रतिनिधी – दि.१८संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्या मध्ये असलेली औरंगजेबाची कबर उघडून टाकावी तसेच महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर ही कबर काढावी, असं म्हणत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.जामखेड येथील विश्वहिंदू परिषद प्रखंड शाखा जामखेड तथा बजरंग दल ने मागणी केली आहे. जामखेड येथे आज, (१७ मार्च) रोजी विश्व हिंदू परिषद प्रखंड शाखा जामखेड तथा बजरंग दल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन दिले आहे.

यावेळी जिल्हा सहमंत्री डॉ. एकनाथ मुंढे, तालुका कार्यवाह बाळासाहेब दळवी,प्रखंड मंत्री दिगंबर राळेभात, तालुका संयोजक कृष्णा बुरांडे, योगेश औचरे, मंगेश पवार, रामेश्वर हगवणे, मंगेश राळेभात,सौरभ यादव , प्रशांत करडकर, ऋषिकेश माने, ब्रम्हा राळेभात,शिवराज राळेभात,रोहित राळेभात, शुभम चव्हाण, राहुल राळेभात,दिनेश परदेशी अदि विश्व हिंदू परिषद व बजरंग दल चे कार्यकर्ते उपस्थित होते.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,उझबेगी परकीय जिहादी आक्रमक बाबर याचा वंशज औरंगजेब सगळ्या मुघलांची हिंदू देशी परंपरा औरंगजेबाने अतित्राव वेगात चालविली, त्याचे संपूर्ण आयुष्य खून, दगाबाजी, विश्वाघात व हिंदू द्वेष करण्यात गेले. आपल्या सर्व भावांचा खून करून व बापाला कैदेत टाकून त्याने मारले. शिख गुरु तेगबहादूर, व त्यांच्या बरोबर भाई मतिदास व भाई दियाला यांना अतिशय क्रूरपणे दिल्ली येथे मारून टाकले. हिंदूधर्म रक्षणासाठी गुरूंनी हसत आपले बलिदान दिले. गुरु गोविंदसिंह व त्यांच्या परिवाराला पण अतिशय क्रूरपणे औरंगजेबाने ठार केले. गुरूच्या दोन बाल कुमारांना तर याच औरंगजेबाच्या सरदारांनी भिंतीत चिरुन मारले.याचे वेड एवढे होते की, याने श्री. काशी विश्वेश्वराचे देऊळ फोडले, काशीतील बिंदु माधावाचे मंदिर फोडले, मधुरेतील प्रसिद्ध श्री केशवाचे मंदिर फोडून तेथील मूर्ती आग्रा येथील मशिदीच्या पायऱ्याखाली गाडण्यात आली. सौराष्ट्राच्या सोमनाथ मंदिर यानेच उध्वस्त केले, हिंदूंच्या सर्व सण, यात्रा यांवर बंदी घातली. हिंदूवर जिझिया कर या औरंग्याने लादला, त्र्यंबकेश्वर येथील मंदिर पण धाने वाह केले. जेजुरी गडावर आक्रमण केले.हिंदू युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू स्वराज्याचा तर या औरंग्याने कायम द्वेष केला. महाराष्ट्राचे हे स्वराज्य संपविण्यासाठी याने श्री. शिवछत्रपतींना कैद केले. छत्रपती शिवराय विलक्षण बतुराईन सुटले पुढे छत्रपती शिवरायांनंतर हिंदु प्रताप सुर्य छत्रपती संभाजी महाराज यांचा तर अतोनात छळ या औरंग्याने केला. सुमारे चाळीस दिवस हा छळ चालू होता. केवळ छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्विकारावा यासाठी हा छळ होता. अतिशय धीरोदात्तपणे छत्रपती संभाजी महाराजांनी आपले बलिदान सिद्ध केले. पुढे याच औरंग्याने रायगड दुर्गास आग लावली व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी राणी येसूबाई व पुत्र शाहू महाराज यांना कैद केले. अनेक वर्षे हे त्याच्या कैदेत होते छत्रपती शाहू महाराजांचा धर्म परिवर्तनाचा प्रयान अनेक वेळा केला. नेताजी पालकरांना धर्मांतरण करण्यास यानेच भाग पाडले.
असा हिंदुद्रोहा, स्वतः च्या बंधू व बापाचा खून करणारा, वा देशाशी, इथल्या संस्कृतीशी, परंपरांशी कुठलीही आत्मियता नसणारा व आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा छळून वध करणारा औरंग्या, याचे कुठलेही स्मारक, कबर या भारतात असणे म्हणजे एक प्रकारे त्याने केलेल्या अन्यायांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे.तरी आमच्या भावना आपल्या मार्फत सरकार दरबारी पाठविण्यात यावे.

Back to top button