बीड

अडचणीत असलेल्या रसल ला वाचवायला गेला आणि त्यानेच डंख मारला.

अडचणीत असलेल्या रसल ला वाचवायला गेला आणि त्यानेच डंख मारला.
बीड :- डॉक्टर हे माणूस रूपी देवच अस म्हणण्यास काहीच हरकत नाही. रुग्णांची सेवा करणे, त्यांना धीर देणे, तत्परतेने क्षणाचा ही विलंब न लावता योग्य ती काळजी घेणे. हे बीड शहरातील डॉक्टर यांची ओळख झालेली पहावयास मिळते. असाच काहीसा प्रकार डॉ.निलेश मिसाळ यांच्या तत्परतेने पहावयास मिळाला.
           दोन दिवसापूर्वी रसल सारख्या विषारी सापाने ठोकळ यांना डंख मारला. आणि त्या सापाच्या डंख ने ठोकळ यांच्या पूर्ण शरीरात विषाचा प्रसार झाला. मात्र सोबत असलेले ठोकळ यांचे सर्व सहकारी मित्रांनी त्यांना कमी वेळेत बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची अवस्था बघून सर्वांच्या चेहऱ्यावरील रंग बदलला होता. तेवढ्यात  डॉ. निलेश मिसाळ यांना कॉल करून घडलेला प्रकार सांगितला. आणि अवघ्या पाच मिनिटात देवाच्या रूपात त्यांना वाचवण्यासाठी डॉ. मिसाळ तत्पर झाले कसल्याही गोष्टीचा विनाविलंब न करता त्यांच्या वर उपचार चालू केले. ठोकळ साठी तब्बल दोन तास जवळ उभे थांबून ठोकळ यांना धीर देऊन त्यांच्या जीवनात पुनर्वसन करण्याची ऊर्जा दिली. यामुळे डॉ. निलेश मिसाळ यांचा बीड शहरात नावलौकिक झाला आहे.
Back to top button